धार्मिक शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर संस्था चालकाचा बलात्कार

छत्रपती संभाजीनगर(अलकनंदा मोरे)

धार्मिक शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर संस्थाचालकाने बलात्कार केला,दुसऱ्या विद्यार्थिनीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना कन्नड तालुक्यातील हतनूर येथील एका निवासी शिक्षण संस्थेत घडली आहे.पीडित विद्यार्थिनीच्या आईने या प्रकरणात कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली.त्यावरून पोलिसांनी तातडीने कारवाई करत संस्थाचालक व्यक्तीविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.दादा महाराज अकोलकर उर्फ बाबा असे या नराधमाचे नाव आहे. अकोलकरची माऊली वारकरी कन्या शिक्षण संस्था असून,त्याच्या संस्थेत धार्मिक व शालेय शिक्षण घेण्यासाठी पंधरा मुली राहतात.13 ते 18 वयोगटातील या मुली असून,यातील एका 13 वर्षीय मुलीला धमकी देत त्याने बलात्कार केला.तिच्या सोबतच्या 14 वर्षीय मुलीवरही बलात्काराचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.तो विद्यार्थिनीकडून सुरवातीला पाय दाबून घ्यायचा.सर्व मुली झोपेत असताना 20 ऑगस्टला रात्री 12 ते 12.30 च्या सुमारास त्याने मुलीला झोपेतून उठवून बोलावले.तिला पाय दाबण्यास सांगितले. ती पाय दाबत असतानाच त्याने बलात्कार केला.या बाबत कुणाला काही सांगितले तर शिक्षण देणार नाही.अशी धमकी त्याने दिलीं.धमकीला घाबरून तिने अत्याचार सहन केला.त्यानंतर त्याने तिच्या बाजूला झोपलेल्या 14 वर्षीय मुलीलाही पाय दाबण्यासाठी बोलावून घेत बलात्काराचा प्रयत्न केला.बाहेर आवाज आल्याचा भास झाल्याने तो उठला.ही संधी साधून मुलगी तिथून पळाली.दोघींनी भयभीत अवस्थेत रात्र जागून काढली.त्यानंतर कुटुंबीयांना कळवले.कुटुंबीयांनी येवून अकोलकरला जाब विचारला असता तो बलात्कार केल्याचे नाहीच म्हणत होता.त्यानंतर पीडितेच्या आईने कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला.पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार करत आहेत.घटनेची माहिती मिळताच सदरील संस्थेत उपविभागीय अधिकारी विजय कुमार ठाकूरवाड,सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र पवार यांनी अकोलकरला अटक केली.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!