महागाव यवतमाळ(सदानंद जाधव)
महागांव तालुक्यात मागील काही महिन्यापासून बोगस कंपनीच्या खतांची विक्री जोमात सुरू होती. याचा सुगावा अमरावती पथकाला लागताच त्यांच्यामार्फत महागांव शहरातील काही कृषी चालकाची तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये काही खतांचे नमुने अमरावती पथकाच्या अधिकाऱ्यांनी सोबत घेतले होते. त्या नमुन्या मध्ये कृषी केंद्रात विक्री ठेवलेल्या सर्व कंपनीच्या खतांचे उगम प्रमाणपत्राचा समावेश करून घेतले नसल्याचे आढळून आले. विक्री होत असलेले खत साठवणुकीचे स्थळ परवानामध्ये समाविष्ट नसल्याचे आढळून आलेतसेच कृषी केंद्र चालक पोटॅश मोबिलायझिंग बायो फटीर्लायझर हे खत शेतकऱ्यांना बिलामध्ये पोटॅशखत नमूद करून विक्री करत असल्याचे आढळून आले. त्यामुळे आदेश १९८५ मधील नियम ३१ नुसार परवाना प्राधिकारी अधिकारी यांनी त्या कृषी केंद्र चालकांचा ६० दिवसासाठी परवाना निलंबित केला असून मध्यंतरी विक्री करताना आढळल्यास कारवाई करण्याचे निर्देश दिले.
