मेहकर ; स्वच्छता अभियानाचे वाजले तीन तेरा नगरपालिकेकडून स्वच्छता अभियानाचा फक्त बोलबालाच प्रत्यक्षात घाणीचे साम्राज्य नाल्यांमध्ये साचला कचरा घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

मेहकर(उध्दव फंगाळ)
महाराष्ट्र सरकार कडून प्रत्येक शहरामध्ये मोठा गाजावाजा करून स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे इतर अनेक शहरांमध्ये हे अभियान यशस्वी सुद्धा होत असल्याचे दिसून येत आहे मात्र मेहकर शहरांमध्ये सुरुवातीच्या काळात स्वच्छता अभियान थोड्याफार प्रमाणात राबविण्यात आले शहरातील मुख्य ठिकाणच्या व काही वार्डातील भितींना रंग रंगवट्या करण्यात आल्या मोठा गाजावाजा सुद्धा करण्यात आला विविध घरावर स्वच्छता अभियानाचे शिक्के सुद्धा लावण्यात आले मात्र हा स्वच्छता अभियानाचा गाजावाजा फक्त दिखावाच राहिला की काय असे म्हणण्याची वेळ सध्या मेहकर शहरात येत आहे मेहकर शहरात सध्या नाल्यामध्ये घाण कचरा साचत आहे पावसाळ्याचे दिवस असल्याने नाल्या तुडुंब भरत असल्याने पावसाचे व नालीमधील घाण पाणी रस्त्यावर येत आहे त्यामुळे कमालीची दुर्गंधी पसरत आहे या दुर्गंधीमुळे लहान लहान मुले व वयोवृद्ध आजारी पडत आहेत घाणीमुळे विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे नागरिकांनी अनेक वेळा नगरपालिकेकडे नाल्यांमधील कचरा साफ करण्याची मागणी केली आहे मात्र नगरपालिकेतून पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे आता नागरिक स्वतःच घरापुढच्या घाण साचलेल्या नाल्यांचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करत आहे मेहकर शहरात कचरा उचलून नेण्यासाठी कचरा गाड्या सुद्धा (घंटागाड्या )उपलब्ध असल्याचे दिसून येत आहेत मात्र ह्या घंटागाड्या सुद्धा कधी येतात व कधी जातात हेच अनेकवेळा समजत नाही त्यामुळे मेहकर शहरात सध्या तरी स्वच्छता अभियानाचे तीन तेरा वाजले आहेत दरम्यान मेहकर येथे बालाजी मंदिर रोडवर कचरा आणि घाण साचल्याने सर्वत्र अस्वच्छता दिसून येत आहे शहरातील बहुतांश वॉर्डांची साफसफाई न झाल्याने वॉर्डातील नाल्यांमध्ये कचरा आणि घाण साचून राहते, त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावर पाणी येते. बालाजी मंदिराजवळ असणारा शहरातील मुख्य रस्ता या बालाजी मंदिरात अध्यात्मिक दर्शनासाठी भाविक येत असतो नाल्या आणि रस्त्यावर साचलेला कचरा ये-जा करताना त्रास होत असल्याचे या रस्त्यावर साचलेल्या कचऱ्याची अनेक महिन्यांपासून सफाई होत नसल्याचे या बाबत पालिकेच्या संबंधित विभागाला सांगण्यात आले. रस्ता आणि नाल्यांमधील घाण मात्र त्यांनी ऐकली नाही, त्यानंतरही संकुलातील नागरिकांनी पालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी केली आहे त्यामुळे लोकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे आणि त्यामुळे स्वच्छता कर्मचारी प्रभागात कधी येतात हे लोकांना कळतही नाही.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!