मेहकर (उध्दव फंगाळ) मेहकर मतदार संघावर महायुतीचा झेंडा कायम ठेवण्यासाठी महायुतीचे विद्यमान आमदार यांनी कंबर कसली असून दुसरीकडे मेहकर मतदार संघात लोकसभेत महाविकास आघाडीचे वाढलेले मतदान पाहता महाविकास आघाडीमध्ये सध्यातरी उत्सवाचे वातावरण असून लोकसभेत वाढलेले महाविकास आघाडीची मतदान टक्केवारी विधानसभेत कायम राहील का विद्यमान आमदार चौकार मारतील का वंचित बहुजन आघाडी व तिसरी आघाडीची भूमिका नेमकी काय राहणार असे अनेक तर्क वितर्क सध्यातरी राजकीय तज्ञाकडून व्यक्त करण्यात येत असून कोणत्याही उमेदवाराला येणारी मेहकर विधानसभेची निवडणूक पाहिजे तेवढी सोपी जाईल असे चित्र तरी दिसत नाही मात्र महायुतीकडे मेहकर विधानसभेची जागा कायम ठेवण्यासाठी महायुतीकडून जय्यत तयारी सुरू आहे नियोजनबद्ध पद्धतीने रणनीती आखल्या जात आहे तर दुसरीकडे मेहकरची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे जाणार असून उद्धव बाळासाहेब गटाचा उमेदवार कोण असणार हे अद्याप गुलदस्तात असल्यामुळे महाविकास आघाडीची उत्सुकता वाढत आहे मात्र कोणत्याही निवडणुकीत निर्णायक मतदान घेणारी वंचित बहुजन आघाडी यांच्याकडून कोणता उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार व तो उमेदवार किती मतदान खाणार किंवा विजयी झेंडा फडकवणार या संदर्भातही अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत मात्र काहीही असले तरी यावेळेस महायुती ,महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडी कडून तगडे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा असून सध्या चर्चेत असलेली तिसऱ्या आघाडीकडून मेहकर मतदार संघात मात्र कोणतीच हालचाल दिसून येत नाही त्यामुळे सध्या तरी फक्त तर्क वित्तर्क काढण्यात येत असून जेव्हा प्रत्यक्षात उमेदवार जाहीर होतील व निवडणुकीला सुरुवात होईल त्यावेळी मात्र निवडणूक चांगलीच रंगात येणार आहे लोकसभेच्या निवडणुकीत विद्यमान केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर व विद्यमान क्रांती आघाडीचे रविकांत तुपकर हे तीन उमेदवार रिंगणात होते या तीनही उमेदवारांमध्ये अतिशय तारेवरची कसरत झाली होती रविकांत तुपकर यांनी अतिशय गनिमी कावा पद्धतीने पूर्ण बुलढाणा जिल्ह्यातच घाटा खालचा भाग वगळून मोठ्या प्रमाणात मतदान घेतले होते त्यामुळे विधानसभेत रविकांत तुपकर यांची तिसरी आघाडी नेमकी काय भूमिका घेणार व तिसऱ्या आघाडीचे उमेदवार कोण असणार याबाबत चर्चा सुरू आहेत तर दुसरीकडे लोकसभेमध्ये मेहकर मतदार संघात महायुतीच्या उमेदवाराला केवळ 273 मतदानाची टक्केवारी होती तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराची टक्केवारी अपेक्षेपेक्षाही जास्त मेहकर मतदार संघात वाढली होती वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीमुळे महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे त्याच उलट महायुतीमध्ये मात्र चिंताग्रस्त वातावरण पाहायला मिळत आहे मात्र काहीही असले तरी मतदार राजा वेगवेगळ्या निवडणुकीत लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत अशा निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मतदान करत असतात हा विषय जवळपास सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे लोकसभेत मेहकर मतदार संघात वाढलेली महाविकास आघाडीची मतदान टक्केवारी विधानसभेतही कायम राहील हे सांगणे सध्या तरी कठीण आहे तर विद्यमान आमदार महायुतीची टक्केवारी वाढवून होऊन महायुतीचाच झेंडा मेहकर मतदार संघावर कायम ठेवण्यासाठी युद्ध पातळी रणनीती आखत असल्याचे दिसून येत आहे दुसरीकडे अगोदर काँग्रेसकडे असलेली मेहकरची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे जाण्याची दाट शक्यता असली तरी सुद्धा महाविकास आघाडीचा किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उमेदवार अद्याप कोण याबाबत कमालीची सम्रामावस्था दिसून येत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सध्यातरी तीन ते चार इच्छुक उमेदवार जनतेशी संपर्क साधून आहेत
मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची अधिकृत उमेदवाराची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे अद्याप तरी अधिकृतपणे निश्चित झालेली नाही दुसरीकडे तिसऱ्या आघाडीचा उमेदवार ही कोण असेल याबाबतही सध्या कुठेही चर्चा होताना दिसत नाही वंचित बहुजन आघाडीकडे जवळपास उमेदवार आतल्या गोटातून निश्चित झाले असल्याचे बोलल्या जात आहे त्या उमेदवाराने संपर्क सुद्धा वाढविल्याचे चित्र आहे मात्र अधिकृतपणे अजूनही गुप्तता पाळल्या जात आहे काहीही असले तरी मेहकर विधानसभेची निवडणूक मात्र पाहिजे तेवढी सोपी यावेळेस तरी होईल असे चित्र दिसून येत नाही महायुतीच्या उमेदवाराला जोरदार टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडी कडून आखणी करण्यात येत आहे तर कोण कोणत्या उमेदवाराचे मतदान खाऊ शकतो यासाठी सुद्धा गुप्त पद्धतीने रणनीती आखल्या जात असल्याचे बोलल्या जात आहे कारण विजयी उमेदवारापेक्षा मतदान खाणाऱ्या उमेदवारालाच राजकारणात जास्त महत्त्व प्राप्त होत असते हे मागील अनेक निवडणुकीवरून मेहकर मतदार संघातील जनतेला दिसून आले आहे मात्र सध्या तरी मेहकर मतदार संघाची परिस्थिती पाहता कोणीही उघडपणे बोलायला तयार नाहीत मात्र मतदारांच्या किंवा जनतेच्या मनातील आमदार कोण या संदर्भात तर्कवितर्क काढल्या जात आहेत काहीही असले तरी महायुतीचे विद्यमान आमदार हे मेहकरची जागा आपल्याकडे कायम ठेवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा झेंडा मेहकर मतदार संघावर यावेळेस फडकलाच पाहिजेत यासाठी सुद्धा गनिमी कावा व सर्वच गोष्टींची उपायोजना करण्याची तयारी सुरू आहे तर या दोन्ही उमेदवारांचे मतदान खाण्यासाठी इतर उमेदवारही कंबर कसून मैदानात उतरत असल्याचे दिसून येत आहे मात्र या दोन्ही उमेदवाराच्या भानगडीमध्ये तिसऱ्याचा फायदा होईल की काय असेही दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे काहीही असले तरी मेहकर विधानसभेची निवडणूक पाहिजे तेवढी सोपी होणार नसून सर्वच उमेदवार यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे एवढे मात्र खरे
