पावसाळ्यातही मेहकर शहराला 12 ते 13 व्या दिवशी पाणीपुरवठा पावसाळ्यात पाणी टंचाई कशी नगरपालिकेत अध्यक्ष, नगरसेवक नसल्याने अधिकारी कर्मचाऱ्यावर वचक नाही का माजी नगराध्यक्ष व माजी नगरसेवक यांचे नगरपालिकेवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी नाही का निवडणुकीपुरताच शहरवासी यांचा वापर करायचा का माजी नगराध्यक्ष कासम भाई गवळी यांच्या काळात 6 ते 7 व्या दिवशी होत होता पाणीपुरवठा

मेहकर (उध्दव फंगाळ)
सध्या मेहकर शहरात पाणीपुरवठ्याची दयनीय अवस्था दिसून येत आहे पावसाळ्याचे दिवस असून सुद्धा मेहकर वाशी यांना बाराव्या ते तेराव्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येत आहे त्यामुळे पावसाळ्यातही पाणीटंचाई कशी असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे सध्या नगरपालिकेमध्ये अधिकृत किंवा नियमानुसार नगराध्यक्ष व नगरसेवक नसल्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यावर वचक नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे तर जे माजी नगराध्यक्ष किंवा माजी नगरसेवक आहे त्यांनी नगरपालिकेच्या कारभारावर लक्ष ठेवणे आपले कर्तव्य नाही का असा सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे का फक्त निवडणुकीपुरताच मेहकर वाशियांचा वापर करून घ्यायचा असा प्रश्न सुद्धा जनमानसात चर्चिल्या जात आहे
नगरपालिकेच्या निवडणुका काही तांत्रिककारणामुळे घेण्यात आल्या नाहीत त्यामुळे नगरपालिका बरखास्त झाली असून सध्या नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष व नगरसेवक नाहीत त्यामुळे मेहकर शहरात ज्या समस्या निर्माण होत आहेत त्या समस्या मांडायच्या कोणाकडे असा प्रश्न जनतेला पडला आहे अधिकारी कर्मचारी हे त्यांच्या परीने होईल तेवढे काम करतात मात्र जर नगरसेवक किंवा नगराध्यक्ष असते तर ते आपापल्या वार्डातील समस्या काळजीने सोडविण्यासाठी प्रयत्न करत होते मात्र प्रश्न असा उपस्थित होतो जे माजी नगराध्यक्ष किंवा माजी नगरसेवक आहेत त्यांनी लक्ष ठेवणे गरजेचे नाही का केवळ निवडणुका जवळ आल्या की अनेक इच्छुक मेहकर शहरातील जनतेच्या भेटीगाठी घेतात तुमच्या मूलभूत सुविधा आम्ही सोडू असे मोठ्या उत्साहात आवर्जून सांगतात मग आता या समस्या निर्माण होत आहेत किंवा नेहमीच ज्या समस्या आहेत त्या सोडविण्याची जबाबदारी माजी नगराध्यक्ष किंवा माजी नगरसेवकाची नाही का नगरपालिकेकडून पावसाळा असताना सुद्धा बारा किंवा तेराव्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येत आहे काही तांत्रिक अडचण असेल तर लोक समजू शकतात मात्र तांत्रिक अडचण नसताना सुद्धा नेहमीच बाराव्या किंवा तेराव्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत पाण्याची जास्त दिवस साठवणूक जर केली तर त्यामध्ये मच्छरांचा प्रादुर्भाव होऊन आरोग्य खराब होऊ शकते नगरपालिकेने कमीत कमी पाचव्या ते सहाव्या दिवशी पाणीपुरवठा करावा एक तास सध्या न सोडण्यात येत आहेत मात्र जर पाचव्या किंवा सहाव्या दिवशी मिळाले तर ही नळ सोडण्याचा वेळ कमी केला तरी काही अडचण नाही मात्र महिन्यातून कमीत कमी चार वेळेस पाणी पुरवठा होणे गरजेचे आहे मात्र तसे होताना बिलकुलच दिसत नाही अनेक वार्डामधून सोशल मीडियावर पाणीपुरवठा घाण कचरा आरोग्य धोक्यात असे मेसेज व्हायरल होत आहे अनेकांनी नगरपालिकेकडे वेळोवेळी तोंडी तक्रारी करून वेळप्रसंगी निवेदन देऊन कारवाई होत नसल्याने अनेक सुज्ञ नागरिकांनी आता सोशल मीडियाचा आधार घेतला आहे कारण नगरपालिकेला सध्या कोणीच वाली नसल्याने जनता मात्र वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!