सिंदखेडराजा (दिलीप वणवे):-तालुक्यातील मौजे साखरखेर्डा हे सिंदखेड राजा तालुक्यातील सर्व मोठे ग्रामपंचायत म्हणून साखरखेर्डा या गावाची ओळख आणि लवकरच नगरपालिकेमध्ये रूपांतर होण्याच्या मार्गावर असतानाच साखरखेर्डा विविध प्रकरणांमध्ये चर्चेत येताना दिसून येत आहे यापूर्वी येथे अंमली पदार्थ असो किंवा आता डेंगु चा दुसरा बळी हा साखरखेर्डासाठी चिंतेचा विषय आहे.
येथे डेंगु सदृश्य तापेची साथ जोराने फोफावत असून याच आठवड्यात या डेंगु सदृश्य तापेचा दुसरा बळी अशोक कामाजी देवकर वय ३४ हा ठरला असल्याची चर्चा होत आहे .
साखरखेर्डा येथे तापेचे रुग्ण वाढत असून खाजगी दवाखाने भरगच्च भरलेले आहे त्याचा फटका सर्वसाधारण माणसाला बसत असल्याचे दिसून येत आहे दवाखाने गच्च भरली आहेत . काल २३ ऑगस्ट रोजी वार्ड क्रमांक सहा मधील अशोक कामाजी देवकर यांना ताप आली . त्यातच त्यांचा बीपी कमी झाला . त्याला तातडीने चिखली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता तेथील डाॅक्टरांनी तातडीने छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्याचा सल्ला दिला . परंतू परिस्थिती नाजूक असल्याने अशोकला बुलढाणा येथे नेले तेथे उपचार करण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला . वाढता डासांचा प्रादुर्भाव पाहता डेंगु सदृश्य रुग्णांची संख्या वाढत असून यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभाग आणि ग्राम पंचायतीने ठोस पावले उचलावीत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे . २१ ऑगस्ट रोजी प्रियंका समाधान नरवाडे या युवतीचा डेंगु सदृश्य तापेने मृत्यू झाला होता . ताप आल्यानंतर तिचाही बीपी कमी झाला होता . तीलाही छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते . त्यानंतर दोन दिवसांनी अशोक देवकर यांचा मृत्यू झाल्याने गावात खळबळ उडाली आहे . साखरखेर्डा मध्ये सर्वच प्रभागात तात्काळ धूर फवारणी करणे गरजेचे आहे अशी मागणी ग्रामस्थांकडून होतं आहे..
