मेहकर;भीम आर्मी उतरणार रिंगणात भीम आर्मी मुळे अनेकांचे गणित बिघडण्याची शक्यता युवा नेतृत्व असलेले डॉ. राहुल दाभाडे यांच्या हालचाली सुरू लवकरच मेहकर मतदारसंघात विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज जागृती

मेहकर (उध्दव फंगाळ)

मेहकर विधानसभा मतदार संघात निवडणूक लढविण्यासाठी महायुती, महाविकास आघाडी, तिसरी आघाडी ,वंचित बहुजन आघाडी यांच्याकडून हालचाली सुरू आहे तर आता मेहकर मतदार संघात निवडणूक लढविण्यासाठी भीम आर्मी सुद्धा सज्ज झाले असून लवकरच मेहकर मतदार संघात विविध जनहिताचे कार्यक्रम घेऊन समाज जागृती करण्यात येणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे भीम आर्मी कडून युवा नेतृत्व असलेले डॉ. राहुल दाभाडे यांच्या हालचाली सुरू झाल्या असून डॉ. राहुल दाभाडे यांनी या अगोदर वंचित बहुजन आघाडी मध्ये काम केलेले असून मेहकर तालुका अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे त्यामुळे डॉक्टर राहुल दाभाडे यांना राजकारण व समाजकारणाचा दांडगा अनुभव आहे भीम आर्मी मेहकर विधानसभा निवडणूक रिंगणात उतरणार असल्यामुळे विविध राजकीय पक्षाचे समाजाचे गणित बिघडण्याची दाट शक्यता आहे
विधानसभेच्या निवडणुकीला हळूहळू रंग येत आहेत याच पार्श्वभूमीवर भीम आर्मीने सुद्धा मेहकर मतदारसंघात निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यात समाज जागृतीसाठी शेतकरी व गोरगरिबांच्या हितासाठी अनेक तीव्र स्वरूपाचे आंदोलन सुद्धा केलेले आहे त्यांच्या आंदोलनाला अनेक वेळा यश मिळाले असून भीम आर्मीची पाळीमुळे हळूहळू बुलढाणा जिल्ह्यात पसरायला सुरुवात झाली आहे भीम आर्मी मध्ये युवकांची मोठी फळी तयार झालेली आहे दरम्यान मेहकर मतदार संघात सुद्धा भीम आर्मी निवडणूक रिंगणात उतरणार असून डॉक्टर राहुल दाभाडे यांच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली जाणार आहे डॉक्टर राहुल दाभाडे यांनी जनसंपर्क वाढविला असून युवा वर्गामध्ये राहुल दाभाडे यांचे चांगले वर्चस्व आहे मागील काळात त्यांनी विविध राजकीय व सामाजिक कार्यक्रम घेऊन हे कार्यक्रम यशस्वी सुद्धा केलेले आहेत भीम आर्मी मेहकर विधानसभा निवडणूक रिंगणात उतरणार असल्यामुळे इतर पक्षाच्या उमेदवाराची समाजाची गणित बिघडण्याची शक्यता जाणवत आहे त्यामुळे मेहकर विधानसभा निवडणुकीला चांगला रंग येणार असून ही निवडणूक अटीतटीची होणार असल्याचे बोलल्या जात आहे

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!