मेहकर (उद्धव फंगाळ )
मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील डोणगाव अर्बन बँक ही बँक नेहमी विविध सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असते गोरगरिबांना आर्थिक मदत गरजूंना नियमानुसार कर्ज बचत गटांना कर्ज महिलांची आर्थिक प्रगती सुधारावी यासाठी डोणगाव अर्बन सदैव पुढाकार घेत असते याच पार्श्वभूमीवर डोणगाव नगरीचे नवीन झालेले विरोध सरपंच चरण भाऊ आखाडे यांचा डोणगाव अर्बन च्या वतीने मोठ्या उत्साहाच्या वातावरणात सत्कार करण्यात आला उपसरपंच श्याम इंगळे यांच्या वतीने सरपंच चरण भाऊ आखाडे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी डोणगाव अर्बन चे अध्यक्ष रुषांक चव्हाण डॉक्टर ज्ञानेश्वर टाले देवेंद्र आखाडे सुबोध आखाडे गजानन होनमने यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते
