मेहकर (उध्दव फंगाळ)
श्रावण महिण्याच्या शेवटच्या सोमवारी मोठ्या भक्तिभावाने शिवभक्तांनी दरवर्षीप्रमाणे औंढा नागनाथ ते (सिद्धपूर) सुलतानपूर अशी कावड यात्रा काढण्यात आली होती. त्यावेळी भक्तीमय वातावरणात शिवभक्तांनी गुलाल उधळण करीत, हर हर महादेव व बम बम भोलेच्या गजर करीत भाविकभक्त कावड यात्रेत पायी चालत होते. त्यावेळी महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागात राहिलेले सहसचिव व मेहकर मतदार संघात इच्छुक असलेले सिद्धार्थ खरात कावड यात्रेत थिरकले भक्तिमय वातावरणात बम बम भोलेचा आनंद कावड यात्रेतील भोलानाथाच्या प्रतिमेचे पूजन केले. तेथे नतमस्तक होऊन भक्तीमय वातावरणात, शिवभक्तांचे स्वागत केले. आणि सिद्धार्थ खरात यांनी कावड खांद्यावर घेतली व शिवभक्तांच्या सोबत बम बम भोलेचा जयघोष केला. त्यावेळी शिवभक्तांनी सुद्धा सिद्धार्थ खरात यांचे शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले आणि अक्षरशः शिवभक्तांनी सिद्धार्थ खरात यांना खांद्यावर घेतले व डीजेच्या तालावर गुलालाची उधळण केली. अशा भक्तिमय वातावरणात कावड यात्रेत भोलानाथाच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता. त्यावेळी सिद्धार्थ खरात म्हणाले की, कावड यात्रेत सहभागी होण्याचं आणि कावड खांद्यावर घेण्याचं माझं भाग्य समजतोय. तसा मी सुरवातीपासून वारकरी संप्रदायाच्या विचारांनी प्रवाहित झालेला आहो. संत, महात्म्य, महापुरुषांच्या विचारांचा जागर करणारा आहो. आणि शिवभक्तांचा मी भक्त आहो. अनेक वेळा पायी दिंडीत सहभागी होऊन वारकऱ्यांसोबत विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी गेलेला आहो. आज शिवभक्तांनी कावड यात्रेत जो माझा सत्कार केला तो अविस्मरणीय असून तुमचे प्रेम पाहून खरोखरच मी भारावून गेलो आहे. अशा भावना सिद्धार्थ खरात यांनी कावड यात्रेत व्यक्त केल्या आहेत. कावड शिवभक्तीचा महिमा अपार शक्तिचा व तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा हा एक प्रकारचा उत्सवच असतो. या कावड यात्रेचा समारोप महादेव मंदिर सुलतानपूर येथे जलअभिषेक करून करण्यात आला. कावड यात्रेत सुलतानपूर येथील शंकर पंडित, शंकर राजगुरू, धनंजय रिंढे, शरद धांडे, सागर पडघान,सुमित कुटे, गोविंदा नालिंदे, प्रणव सोनूणे, ऋषिकेश सोनवणे, मंगेश खेत्रे, गोटू जुमडे, गजानन पालवे यांच्यासह असंख्य शिवभक्त उपस्थित होते.
