मेहकर (उध्दव फंगाळ)
सध्या मेहकर शहरासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात आमदार संजय रायमुलकर यांचा वाढदिवस गेल्या एक महिन्यापासून चांगला चर्चेमध्ये आला आहे वाढदिवसाच्या जवळपास सात ते आठ दिवस साजरा करणे शुभेच्छा देणे यामुळे वाढदिवस चर्चेत राहणे हे सहाजिक आहे मात्र आमदार संजय रायमुलकर यांचा वाढदिवस चर्चेमध्ये राहावा यासाठी विरोधी पक्षाचे नेतेच प्रयत्न करत असल्याचे चित्र दिसून येत आहे मात्र ज्या संदर्भात तक्रारी करण्यात येत आहेत तो डीपी रोड हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडेच असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे नगरपालिका व नगरपालिका मुख्याधिकारी यांना विनाकारण टार्गेट करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे मेहकर मतदारसंघात जनहिताच्या इतरही अनेक समस्या आहेत मग वाढदिवस मंडप प्रकरण कशासाठी असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे नेते आमदार संजय रायमुलकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात तर दुसरीकडे वाढदिवसाच्या कार्यक्रम मंडप वरून सुद्धा तक्रारी करताना दिसून येत आहेत त्यामुळे मेहकर मतदार संघात चाललेले राजकारण हे अजब गजब दिसून येत असून मेहकर मतदार संघातील जनता मात्र सर्वांनाच ओळखून आहे हे सुद्धा सर्वच नेत्यांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे
विधानसभेच्या निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत त्या दृष्टीने राजकारणात आपले नाव चालले पाहिजेत आपण चर्चेत असले पाहिजे असे सर्वच नेते मंडळी व इच्छुक उमेदवार प्रयत्न करीत असतात व ते साहजिक सुद्धा आहे मात्र आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांच्या वाढदिवसाच्या डीपी रोडवरून सध्या मेहकरत चांगलेच वातावरण चर्चेत येत आहे डीपी रोडवर आमदार संजय रायमुलकर यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त मंडप टाकण्यात आला होता त्या मंडपाच्या त्याचवेळी अनेकांनी तक्रारी केल्या विरोधी व सत्ताधारी पक्ष एकमेकावर आरोप प्रत्यारोप तक्रारी करतच असतात त्याबद्दल दुमत नाही या तक्रारीच्या अनुषंगाने दरवर्षीपेक्षा यावर्षी आमदार संजय रायमुलकर यांचा वाढदिवस चांगला चर्चेमध्ये आला विषय असा आहे की ज्यावेळेस मंडप टाकणे चालू होते त्यावेळेस माजी मंत्री सुबोध सावजी यांनी तक्रारी किंवा आंदोलन का केले नाही अशी चर्चा सध्या जनतेमध्ये ऐकायला मिळत आहे तर ज्या डीपी रोड संदर्भात मंडपच्या तक्रारी करण्यात आल्या तो रोड सध्या नगरपालिकेकडे नाहीच त्यामुळे नगरपालिकेकडे तक्रारी कशासाठी करायच्या असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे जर हा रोड नगरपालिकेकडे नाही तर मग नगरपालिकेचे मुख्याधिकारी असे का म्हणतात की आम्ही संबंधितावर कारवाई अथवा केस केली आहे या संदर्भात काही थोडाफार गोंधळ निर्माण झाला आहे डीपी रोड हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडेच असल्याचे समजले आहे त्यामुळे नगरपालिकेला किंवा मुख्याधिकाऱ्याला विनाकारण टार्गेट करण्याचा तर हा प्रयत्न नाही ना असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे कोणताही विभागाचा अधिकारी किंवा कर्मचारी काम करत असताना नियमाची बाजू धरूनच काम करत असतो काही कामे नियमाला डावलून जरी प्रत्यक्षात होत असले तरीसुद्धा ते काम कागदपत्रे मात्र ओकेच असते हे सर्वांनाच माहित आहे अधिकारी व कर्मचारी कधीच आपल्यावर कोणती गोष्ट येऊ देत नाहीत राजकारणाचा दबाव जरी असला तरी अधिकारी व कर्मचारी आपली बाजू सांभाळूनच काम करत असतात हेही तेवढेच खरे आहे मग ज्यांनी तक्रारी केल्या किंवा जे डीपी रोड मंडप संदर्भात कारवाई करा असे म्हणत आहेत किंवा म्हणत होते त्यांनी हा डीपी रोड नेमका कोणाकडे आहे हे पाहणे गरजेचे नाही का माजी मंत्री सुबोध सावजी यांचा अजूनही अधिकारी व कर्मचाऱ्यावर वचक आहे कारण माजी मंत्री सुबोध सावजी यांनी एकदा जो विषय हाती घेतला तो शेवटपर्यंत नेल्याशिवाय ते थांबत नाहीत हे सर्वांनाच माहिती आहे एक चांगली प्रतिमा त्यांची अधिकारी विभागात आहे त्यामुळे सर्वच अधिकारी कर्मचारी त्यांच्या आंदोलनाची धास्ती घेत असतात मात्र आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांच्या कार्यक्रम मंडप संदर्भात डीपी रोडच्या तक्रारी नगरपालिकेकडे करण्यात आल्यामुळे व डीपी रोड हा नगरपालिकेकडे नाहीच त्यामुळे ह्या तक्रारी निरर्थक आहेत का ज्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हा रोड आहे आता त्यांच्या कार्यालयात जाऊन ज्यांनी तक्रारी केल्या ते आंदोलन करतील का? सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याला धारेवर धरतील का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे मात्र हा झाला तक्रारीचा एक भाग वाढदिवस संपन्न झाला मंडपही त्या जागेवरून हटविण्यात आला आहे मग आता तक्रारी कशासाठी मेहकर मतदार संघातील जनता जनार्दनाच्या इतर अनेक समस्या आहेत त्या समस्या घेऊन नेतेमंडळींनी अधिकाऱ्यांना धारेवर धरावे अशी जनमानसात सध्या तरी चर्चा ऐकायला मिळत आहे तूर्ता एवढेच
