मतदार यादीत नाव समाविष्ट करून लोकशाही बळकट करा….. मा. सरपंच अविनाश राठोड युवाशक्ती ही देशाला चालना देणारी.. राठोड

मंठा (डॉ आशिष तिवारी ) तालुक्यतील जि.प.उ. प्राथमिक शाळा नायगाव येथे आज सरपंच श्रीमती चंद्रकला सूर्यवंशी, मा.सरपंच अविनाश राठोड, उपसरपंच नामदेव फुपाटे ,मुख्याध्यापक विष्णुपंत जायभाये ,समाधान काळे आणि बी. एल.ओ .विठ्ठल दुबळकर यांच्या उपस्थितीत अठरा वर्षे पूर्ण झालेल्यांचे मतदान यादीत नाव आलेल्या युवकांना आणि गावकऱ्यांना मतदान कार्डचे वाटप करण्यात आले .
या कार्यक्रमा प्रसंगी बोलताना मा.सरपंच अविनाश राठोड यांनी संविधानिक हक्क म्हणून आपनास एक मतदान करन्याचा हक्क आहे, आणि तो बजावलाच पाहिजे .
आपल्या मतदानातून लोकशाहीच्या पद्धतीतून योग्य माणसाची निवड कशी होईल त्यासाठी आपण मतदान केले पाहिजे.
युवाशक्ती ही गावाच्या पर्यायी देशाच्या विकासाला शक्ती आणि चालना देणारी आहे. एखादे काम युवक वर्गाने हातात घेतले तर ते काम लवकरात लवकर आणि चांगल्या प्रकारे पूर्ण होते. भूतकाळाचा जर विचार केला तर अनेक क्रांती ही युवा वर्गानी घडवलेली आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या क्रांतीमध्ये बलिदान देणारे युवा भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव इ नाव आपन प्रत्येक वेळेस गर्वाने घेत असतो, शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापना, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सुद्धा युवा असतानाच लिहिली होती.
असा इतरांचा इतिहास त्यांनी यावेळी सांगितला.
पुढे त्यांनी 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक व युवतीना बीएलओ मार्फत मतदान यादीत आपले नाव समाविष्ट करून लोकशाही बळकट करा असे आव्हान राठोड यांनी त्यावेळी केले. युवा वर्गाने राजकारणात येऊन गावाच्या विकासासोबत देशाच्या विकासाला कशी चालना मिळेल यासाठी काम करायला हवे.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य गौतम दाहीजे, श्रीहरी मगर, अनिल राठोड, यशोदाबाई अंभोरे, प्रल्हाद फुपाटे इतर गावकरी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!