ब्राईट स्टार इंग्लिश स्कूलमध्ये दहीहंडी कार्यक्रम उत्साहात साजरा.

डॉ मंठा (आशिष तिवारी) ब्राईट स्टार इंग्लिश स्कूलमध्ये सकाळच्या सत्रात नर्सरी, जुनियर आणि सिनियर या वर्गातील चिमुकल्यांनी राधा-कृष्ण, बाळगोपाळ यांच्या वेशभूषेत येऊन गाण्याच्या तालावर नाचून दहीहंडी फोडून गोपाळकाला उत्साहात पार पाडला. तसेच दुपारच्या सत्रात वर्ग पहिली ते नववी या विद्यार्थ्यांची दहीहंडी पार पडली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मंठा शहराचे पो नि निकाळजे, मंठा शहरातील नामवंत उद्योजक आनंदराम सोमाणी, काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष किसनराव मोरे, मंठा शहरातील युवा नगरसेवक दीपक आ बोराडे यांची उपस्थिती लाभली. तसेच कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे व्यवस्थापक अध्यक्ष सुभाषराव निर्वळ, कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक गणेश खिस्ते यांनी केले. दहीहंडीसाठी विद्यार्थी बालगोपाळांचा थर लावण्यासाठी शाळेतील सहशिक्षक वामन राठोड, दिलीप चव्हाण, अनंतराव बोराडे यांनी परिश्रम घेतले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शेंद्रे मॅडम, कु. विजया पोखरकर मॅडम यांनी केले व विद्यार्थ्यांच्या नृत्यासाठी शाळेतील सहशिक्षिका सौ. चव्हाण मॅडम, सौ. दराडे मॅडम, सौ. गोरे मॅडम, सौ.चौधरी मॅडम, सौ. राठोड मॅडम, सौ. महाजन मॅडम, सौ. घोडके मॅडम, सौ. माने मॅडम इत्यादींनी सहकार्य केले आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शाळेमध्ये दहीहंडी उत्साहात साजरी करण्यात आली.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!