आर्थिक दुर्बल घटकातील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांसाठी जेईएफ शिष्यवृत्ती योजना. गत तीन वर्षात 600 विद्यार्थ्यांना 85 लाखाची शिष्यवृत्ती प्रदान.

जालना (डॉ आशिष तिवारी)जालना एज्युकेशन फाउंडेशनतर्फे जालन्यातील दानशूर व्यक्ती आणि संस्था यांच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. गत तीन वर्षात 600 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना 85 लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आलेली आहे. यावर्षीही पॉलिटेक्निक, एमबीबीएस, इंजीनियरिंग, एम. टेक जालना आयसीटी, सीए फाउंडेशन, सीए आयपीसीसी, सीए फायनल, सीएस एक्झिक्यूटिव्ह, सीएस प्रोफेशनल, बी. फार्मसी, बीएस्सी नर्सिंग, बीएस्सी ॲग्री या 12 अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत असून, सन 2024-25 मध्ये वर्षात प्रथम वर्षांत प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी 20 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुरेश लाहोटी आणि अध्यक्ष सुनील रायठठ्ठा यांनी केले आहे.
विद्यार्थ्याच्या कुटुंबियांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या आत असावे. त्याचे दहावी किंवा बारावी शिक्षण जालना जिल्ह्यातच झालेले असावे, उच्च पदवी, पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचाच शिष्यवृत्तीसाठी विचार केला जाणार आहे. प्राप्त अर्जाच्या छाननीनंतर निकषात बसणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांचे जेईएफ टीम त्यांच्या घरी जाऊन आर्थिक परिस्थितीबाबतचे सर्वेक्षण करेल. त्यानंतर प्रत्यक्ष मुलाखती घेऊन अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल. दानशूर व्यक्ती आणि संस्थांच्या लोकसहभागातून राबवली जाणारी महाराष्ट्रातील जिल्हा पातळीवरील सर्वात मोठी शिष्यवृत्ती योजना आहे. पात्रता आणि निकषाद्वारे विद्यार्थ्यांची निवड केली जाते. त्यानुसार एमबीबीएससाठी नीट रँकिंगद्वारे शासकीय महाविद्यालयात प्रवेश आणि बारावीच्या परीक्षेत किमान 60 टक्के गुण, इंजिनिअरिंगसाठी बारावीच्या परीक्षेत किमान 60 टक्के गुण आणि एमएच- सीइटी रँकिंग 10 हजारापर्यंत अथवा जेईई-मेन रँकिंग 50 हजारापर्यंत, सीए फाउंडेशन आणि सीए आयपीपीसीसाठी बारावी परीक्षेत किमान 85 टक्के गुण, बी. फार्मसीसाठी बारावीच्या परीक्षेत किमान 60 टक्के गुण आणि एमएच सीईटी फार्मसी रँकिंग 2 हजारपर्यंत, पॉलिटेक्निकसाठी दहावीच्या परीक्षेत किमान 80 टक्के गुण आणि शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयात प्रवेश, बी. एस्सी नर्सिंगसाठी बारावीत किमान 60 टक्के गुण आणि नीट रँकिंगद्वारे प्रवेश अशी पात्रता असलेले विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करू शकतील.
या योजनेसाठी https://rb.gy/vxxm3x या लिंकवर 20 सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज भरावयाचे आहेत. अधिक माहितीसाठी व्यंकटेशनगरमधील जालना एज्युकेशन फाउंडेशनच्या कार्यालयात अथवा रुक्मिणीकांत दीक्षित (9404607575) यांच्याशी संपर्क साधावा.
जिल्ह्यातील आर्थिक दुर्बल घटकातील गरजू होतकरू विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जालना एज्युकेशन फाऊंडेशनचे प्रा. सुरेश लाहोटी, सुनिलभाई रायठठ्ठा, सुनील गोयल, डॉ. हितेश रायठठ्ठा, दिलीप कुलकर्णी, सुरेश कुलकर्णी-केसापूरकर, गोविंद काबरा, प्रा. ओमप्रकाश झांजरी, सपना गोयल, परेश रायठठ्ठा, प्रा. स्वप्निल सारडा, दिलीप केंद्रे यांनी केले आहे.
============

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!