मंठा तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांनी “”मुख्यमंत्री वयोश्री”” योजनेचा लाभ घ्यावा…. मा.सरपंच अविनाश राठोड** मुख्यमंत्री वयोश्री योजनेकडे प्रशासन दुर्लक्ष !

मंठा (डॉ आशिष तिवारी) तालुक्यातील नायगाव येथे सामाजिक न्याय व विशेष सहायता विभाग मंत्रालय मुंबई अंतर्गत 65 वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक क्षमतेनुसार साधने /उपकरणे पुरविण्यासाठी वयोश्री योजनांची सरपंच श्रीमती चंद्रकला सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली. या योजनेत दारिद्र्यरेषेखालील अपंग ,दिव्यांग दुर्बल व्यक्तींचा सहभाग होतो.
या ज्येष्ठ नागरिकांना सक्रिय जीवन जगण्यासाठी,जीवनात गतिशीलता ,संप्रेषण आणि मोकळेपणाने जीवन जगता यावे यासाठी विविध उपकरणाची आवश्यकता असते त्यात चष्मा, श्रवण यंत्र ,व्हीलचेअर ,कमोड खुर्ची ,लंबर बेल्ट इतर सहभाग होतो.
महाराष्ट्र सरकारने या जेष्ठ नागरिकांना या वस्तू/ साधनासाठी खात्यात आधार बेस, डी.बी.टी द्वारे तीन हजार रुपये खात्यात जमा करणार आहे. जीवनमान उंचावण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी “”मुख्यमंत्री वयोश्री”” योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान मा.सरपंच अविनाश राठोड यांनी या बैठकी प्रसंगी नागरिकांना केले.
अर्जदारांनी आपल्या ग्रामपंचायत मार्फत समाज कल्याण विभाग येथे आपले अर्ज सादर करावेत.अर्ज भरण्यासाठी अर्जदाराला विहित नमुन्याचा अर्ज ,आधार कार्ड तथा मतदान कार्ड, बँक पासबुक ,दोन फोटो, घोषणापत्र, हमीपत्र आणि रेशन कार्ड इतर कागदपत्रांची आवश्यकता आहे.
शेवटी राठोड यांनी ज्याप्रमाणे शासन विविध योजनेची माहितीचा ,प्रसार आणि प्रचार होतो तसा वयोश्री योजनेचा प्रसार आणि प्रचार का झाला नाही यासाठी त्यांनी खंत व्यक्त केली.
या कार्यक्रमात प्रसंगी मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बळीराम राठोड,पोलीस पाटील नारायण फुफाटे,मधुकर देशमुख, शेषराव राठोड, दत्ता फुफाटे, ज्ञानदेव व्यवहारे, सखाराम चिभडे, संतोष राठोड, दिगंबर दराडे, विनायक राठोड,अनिल चव्हाण, नितीन राठोड, पवन राठोड, किरण चव्हाण , सुरेखा चव्हाण, सुमित्रा राठोड ,कौशल्या राठोड इतर गावकरी उपस्थित होती. कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत मार्फत करण्यात आले होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!