अकोला ( उध्दव फंगाळ)
केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रात व महाराष्ट्राच्या बाहेरही गेल्या काही वर्षात रस्त्याचे युद्ध पातळीवर कामे सुरू केले आहेत मोठ्या शहरांना जोडणारे चांगले रस्ते लहान लहान शहरांना जोडणारे सुद्धा चांगले रस्ते तयार करण्याची योजना त्यांनी हाती घेतली आहे या योजनेला चांगल्या प्रमाणात प्रतिसादही मिळत आहे मात्र काही ठिकाणी कंत्राटदाराच्या हेकेखोरपणामुळे किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष यामुळे अनेक ठिकाणी रस्त्याचे तीन तेरा वाजले आहेत त्यामुळे ना खाऊंगा ना खाने दूंगा या नितीनजी गडकरी साहेब यांच्या घोषणेचे अकोला जिल्ह्यातील कंत्राटदाराने तीन तेरा वाजवल्याचे चित्र दिसून येत आहे मालेगाव ते अकोला हा 70 किलोमीटरचा रस्ता नवीन तयार करण्यात आला आहे रस्ता तयार झाल्यानंतर या रस्त्यावर टोल नाका सुद्धा सुरू करण्यात आला आहे मात्र मालेगाव ते अकोला रस्त्याची एवढी दयनीय अवस्था झाली आहे वाहनधारकांना वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे रस्त्यामध्ये जागोजागी खड्डे पडले आहेत अनेक ठिकाणी गिट्टी उघडी पडली आहे मग एवढा रस्ता खराब झाला असताना टोल नाका सुरू कसा झाला टोल नाक्याला परवानगी कशी मिळाली असा प्रश्न उपस्थित होत आहे माजी मंत्री सुबोध भाऊ सावजी हे त्यांच्या सहकार्यासोबत 28 ऑगस्ट रोजी अकोला येथे जात होते त्यादरम्यान त्यांनी रस्त्याची पाहणी केली पाहणी करत असताना पूर्ण रस्ता जागोजागी खराब झाला आहे गिट्टी उघडी पडली आहे रस्त्यामध्ये खड्डे आहेत मग नवीन रस्ता तयार होऊन एवढ्या लवकर खराब कसा झाला असा प्रश्न माजी मंत्री सुबोध भाऊ सावजी यांनी उपस्थित केला आहे रस्ता खराब असताना वाहनधारकांना कोणत्या सुविधा उपलब्ध नाहीत मग टोल नाका सुरू कशासाठी केला केवळ लोकांना आर्थिक भुर्दंड देण्यासाठी टोल नाका सुरू करण्यात आला का असा प्रश्न सुबोध भाऊ सावजी यांनी उपस्थित केला आहे माननीय नितीनजी गडकरी साहेब सांगतात ना खाऊंगा ना खाने दूंगा मंग गडकरी साहेब तुमच्या या घोषणेचे अकोला जिल्ह्यात पूर्णपणे तीन तेरा वाजले आहेत कंत्राटदाराने या घोषणेचा व चांगला काम करण्याच्या योजनेला बाजूला सारून या रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचे दिसून येत आहे त्यामुळे जोपर्यंत रस्ता सुरळीत व चांगला होत नाही तोपर्यंत टोल नाका तात्काळ बंद करावा व रस्ता चांगला तयार करून वाहनधारकांना चांगली सेवा द्यावी अन्यथा मी माजी मंत्री सुबोध भाऊ सावजी कोणतीही पूर्व सूचना न देता तीव्र स्वरूपाचे आंदोलन करीन असा इशारा माजी मंत्री सुबोध भाऊ सावजी यांनी दिला आहे