रविकांत तुपकर बुलढाणा जिल्ह्यातील गणित बिघडवणार आपले शिलेदारही आणणार निवडून मुकुलजी वासनिक यांच्यासोबत कोणतीही चर्चा झालेली नाही महायुती व महाविकास आघाडीला रविकांत तुपकरची धास्ती

मेहकर (उध्दव फंगाळ)
विधानसभेच्या निवडणुकीला हळूहळू रंगत येत असून बुलढाणा जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे रविकांत तुपकर बुलढाणा जिल्ह्यातील सहा मतदारसंघात आपले शिलेदार उभे करणार असून तर उभे केलेले शिलेदार निवडून आणण्यासाठी रविकांत तुपकर जीवाचे रान करणार असल्याचे दिसून येत आहे
मुकुलजी वासनिक यांच्यासोबत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नसून आम्ही आमचे उमेदवार बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात उतरविणार असल्याचे रविकांत तुपकर यांनी सांगितले रविकांत तुपकर यांची बुलढाणा जिल्ह्यात असलेली पकड पाहता महायुती व महाविकास आघाडीने रविकांत तुपकर यांची चांगलीच धास्ती घेतल्याचे दिसून येत आहे सविस्तर असे की विधानसभेच्या निवडणुका लवकरच सुरू होत आहेत या दृष्टीने सर्वच पक्षांनी आपापल्या राजकीय घडामोडी सुरू केले आहेत याच पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अटीतटीची लढत देऊन कोणतेही मोठे राजकीय पाठबळ नसताना आर्थिक परिस्थिती सुद्धा मजबूत नसताना मोठ्या नेत्यांच्या कोणत्याही सभा झालेल्या नसताना रविकांत तूपकर यांनी जवळपास अडीच लाख मतदान बुलढाणा जिल्ह्यात घेतले आहे घाटाच्या वर सर्वच मतदारसंघात रविकांत तुपकर यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळून चांगले मतदान मिळाले आहे हीच वाढलेली मतदानाची टक्केवारी शेतकरी व जनतेचा असलेला आशीर्वाद रविकांत तूपकर येणाऱ्या विधानसभेतही कायम ठेवणार आहेत का? हे पाहणे गरजेचे आहे रविकांत तुपकर यांच्या माध्यमातून किंवा त्यांच्यासोबत असलेले बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांनी आपला प्रचार सुरू केल्याचे दिसून येत आहे रविकांत तुपकर हे महाविकास आघाडी सोबत जाणार असल्याची चर्चा सुरू होती मात्र मुकुलजी वासनिक यांच्यासोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे रविकांत तुपकर यांनी सांगितल्यामुळे आता रविकांत तुपकर आपले स्वतंत्र शिलेदार घेऊन मतदार संघात उतरणार असल्याने महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये व उमेदवारांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे रविकांत तुपकर राजकारण करत असताना कोणताही राजकीय फायदा व्हावा या उद्देशाने राजकारण न करता गेल्या 20 ते 22 वर्षापासून शेतकऱ्यांसाठी व सर्वसामान्य जनतेसाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करत आहे अनेक वेळा त्यांना पोलिसांचा मार खावा लागलेला आहे तर जेलमध्ये सुद्धा जाण्याची त्यांच्यावर पाळी आली आहे मात्र रविकांत तुपकर कुठेही घाबरले नाही किंवा डगमगले नाही त्यांनी आपली वाटचाल जनता जनार्दनांच्या आशीर्वादाने सुरू ठेवली आहे त्याचा परिणाम म्हणून नुकत्याच झालेल्या लोकसभेत त्यांना आला आहे एका शेतकरी व सर्वसामान्य कुटुंबातील मुलाला अडीच लाख मतदान मिळणे ही काही सोपी गोष्ट नाही त्यामुळे जनतेच्या मनात असलेले रविकांत तुपकर विधानसभेत अनेकांचे गणित बिघडण्याची दाट शक्यता आहे रविकांत तुपकर व त्यांचे काही शिलेदार सत्तेमध्ये असले पाहिजेत असे जवळपास सर्वांनाच वाटत आहे मात्र ऐन निवडणुकीच्या वेळी किंवा मतदानाच्या वेळी मोठे राजकीय डावपेच खेळून रविकांत तुपकर यांना दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे मात्र काही असले तरी जेवढा विरोध किंवा षडयंत्र रविकांत तुपकर यांच्यासोबत होत आहे तेवढे त्यांची काम करण्याची पद्धत व त्यांचे आंदोलन मोठ्या उमेदीने व जोराने वाढत असल्याचे चित्र अनेक वेळा दिसून आले आहे काहीही असले तरी रविकांत तुपकर बुलढाणा जिल्ह्यातील इतर राजकीय पक्षांचे गणित नक्की बिघडवणार एवढे मात्र खरे

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!