माँ जिजाऊच्या चरणी रविकांत तुपकर यांचा एल्गार शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सरकारला आणणार धारेवर शेती, नाती संस्कृतीसाठी कटिबद्ध ४ सप्टेंबर पासून अन्नत्याग उपोषण

मेहकर (उध्दव फंगाळ)
रविकांत तुपकर हे नाव म्हटलं की सरकारला घाम फुटतो कारण रविकांत तुपकर यांचे आंदोलन हे शेतकरी हितासाठी नेहमीच असते मात्र आंदोलन करत असताना मागण्या पूर्ण होईपर्यंत किंवा त्या मागण्या मार्गी लागेपर्यंत रविकांत तुपकर आंदोलन मागे घेत नाहीत हे जवळपास बुलढाणा जिल्ह्यासह सरकारला सुद्धा माहिती आहे आंदोलनामधून काहीतरी शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून रविकांत तुपकर आंदोलन करत असतात आता असाच आंदोलनाचा एल्गार रविकांत तुपकर यांनी राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांच्या सिंदखेडराजा यांच्या राजवाड्या समोरून सुरू करणार आहेत या संदर्भात रविकांत तुपकर यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याप्रमाणे घोषणा केली आहे 3 सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या व शेतमजुरांच्या विविध मागण्या जर मान्य झाल्या नाही तर 4 सप्टेंबर पासून अन्नत्याग आमरण उपोषणाचा एल्गार रविकांत तुपकर हजारो शेतकऱ्यासह पुकारण्याचा इशारा दिला आहे त्यामुळे सरकार या आंदोलनाकडे कोणत्या नजरेने पाहते व तीन सप्टेंबरच्या अगोदरच मागण्या मान्य होतात का किंवा उपोषण सुरू झाल्यावर सरकार मागण्या मान्य करणार हे पाहणे गरजेचे आहे रविकांत तुपकर जवळपास 20 ते 22 वर्षापासून आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत हे प्रयत्न करीत असताना अनेक वेळा तीव्र स्वरूपाचे आंदोलन त्यांनी केलेले आहे मात्र प्रत्येक आंदोलनाला यश आल्याचे सुद्धा सर्वांनाच माहिती आहे सरकार म्हटल्यावर थोडाफार उशीर होणारच मात्र जगाचा पोशिंदा शेतकरी राजा यांच्याकडे दुर्लक्ष करणे किंवा त्यांच्या मागण्याकडे निष्काळजीपणाने पाहणे हे चुकीचे आहे त्यामुळे सरकारचे लक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे वळविण्यासाठी रविकांत तुपकर आंदोलनाच्या माध्यमातून नेहमीच तयार असतात रविकांत तुपकर यांच्या पाठीमागे मोठा राजकीय पाठिंबा नाही मात्र शेतकरी राजा व युवकांचा रविकांत तुपकर यांना नेहमी पाठिंबा मिळालेला आहे शेतकऱ्यांच्या मागण्या सोडून घेण्यासाठी रविकांत तूपकर यांनी लोकसभेत सुद्धा उडी घेतली होती मात्र त्यांना त्या ठिकाणी अतिशय कमी प्रमाणात अपयश आले मात्र त्यांनी हिम्मत न हरता निवडणूक दर पाच वर्षांनी येत असते मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न हे नेहमीच असतात व आपण शेतकऱ्यांसाठी झगडतो सत्तेमध्ये येण्यासाठी नाही त्यामुळे रविकांत तुपकर यांनी लोकसभेत आलेले अपयश त्याच वेळी बाजूला सारून आपली आंदोलनात्मक दिशा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हक्काचा पिक विमा सोयाबीन कापूस दरवाढ यासह शेतकरी शेतमजूर व तरुणांच्या हक्काच्या मागण्यासाठी रविकांत तुपकर हे चार सप्टेंबर पासून सिंदखेडराजा येथील राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांच्या राजवाड्यासमोर सकाळी दहा वाजता अन्नत्याग आमरण उपोषणाला सुरुवात करीत आहे त्यामुळे रविकांत तुपकर यांचे आंदोलन किती यशस्वी होते व सरकार रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाकडे कोणत्या नजरेने पाहतात हे पाहणे गरजेचे आहे

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!