महागाव यवतमाळ:-(सदानंद जाधव)
उमरखेड मतदार संघातील महत्त्वाचे निर्णयक भूमिका घेणारा तालुका म्हणून महागाव ची ओळख आहे. पण हा तालुका केवळ मतदाना पुरताच मर्यादीत का ? असा प्रश्न जनतेच्या मनात आहे. महागाव तालुक्यातील बहुतांश मुख्यालय अधिकारी प्रभारावरच आहे महागाव तालुक्या विषयी आमदाराचे असलेले उदासीनता हे मुख्यत्व निदर्शनास येते लाडक्या बहिणीचा योजनेचा दिंडोरा पिटणाऱ्या आमदारांचे स्वकर्तृत्व या तालुक्यासाठी काय ? तर केवळ विकास कामांना अडथळा निर्माण करणे असे दिसून येते तालुक्यातील महत्वाची कार्यालय तहसील, महावितरण, कृषी कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, लघु बंधारे विभाग नगरपंचायत कार्यालय हे सर्व प्रभारावर चालू आहे. प्रत्येक विभागाचे अधिकारी दोन प्रभार संभाळतात पूर्ण क्षमतेने काम करण्यास असमर्थ ठरत आहेत पुसद, उमरखेड, नांदेड , यवतमाळ येथून कामकाज पाहत असल्या यामुळे मुख्यालयात नेहमी आधिकारी गैरहजर असल्याचे दिसून येते त्यांच्यावर वरिष्ठांचे कोणत्याही प्रकारची नियंत्रण नसल्यामुळे तालुक्यातील सर्व सामान्य जनतेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. महागाव तालुक्यातील स्टेट बँक, युनियन बँकची हीच परिस्थिती आहे शेतकरी पीक कजार्साठी बँकांच्या चक्रामारतांना दिसत असून याकडे लोक प्रतिनिधीचे दुर्लक्ष होतांना दिसून येत आहे आमदार साहेब या प्रभार आपण काही कायमस्वरूपी या अधिकारी तालुक्याला देतील का ? जनतेची गिअर सौय टाळतील का? सरकारी योजनेचा धिंडोरा पेटण्या पेक्षा त्या अमलात आणण्यासाठी सक्षम अधिकारी तालुक्याला देणे हे गरजेचे शेतकरी राजावर आहे .
