मेहकर; विकास झाला नाही मग आ.संजय रायमुलकर विजयी कसे होतात विरोध करा मात्र विरोधाला आधार आहे का विकास झाला नाही असे फक्त विरोधकच म्हणतात जनता जनार्दन का म्हणत नाही स्थानिक उमेदवाराचा मुद्दा धरत आहे जोर

मेहकर (उध्दव फंगाळ)
सध्या विधानसभेच्या निवडणुका असल्याने मेहकर मतदार संघात निवडणूक लढविण्यासाठी महाविकास आघाडी, तिसरी आघाडी, वंचित बहुजन आघाडी व महायुतीकडून मोठ्या प्रमाणात हालचाली करण्यात येत आहेत मेहकर मतदार संघ काँग्रेसला सोडावा अशी मागणी काँग्रेस जीव तोडून करत आहे तर दुसरीकडे तिसरी आघाडी, वंचित कडून कोणता उमेदवार येणार याची उत्सुकता वाढली आहे तर महायुतीकडे एकमेव आमदार संजय रायमुलकर हेच नाव सुरू असून महायुतीमध्ये शिंदे शिवसेना गटाला मेहकरची जागा निश्चितच आहे असे एकंदरीत चित्र आज रोजी मेहकर मध्ये दिसत आहे विधानसभा प्रक्रियेला सुरुवात न झाल्यामुळे हालचाली संथ गतीने जरी सुरू असल्या तरीसुद्धा आतल्या गोटातून मात्र व आमदार संजय रायमुलकर यांची घोडदौड रोखण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत इच्छुक व विरोधक उमेदवाराकडून आमदार संजय रायमुलकर यांनी मेहकर मतदार संघात विकास केलाच नाही असे म्हणत जनतेशी संपर्क साधत आहेत मात्र यामुळे प्रश्न असा उपस्थित होत आहे जर आमदार संजय रायमुलकर यांनी विकास केला नाही तर पंधरा वर्षापासून आमदार संजय रायमुलकरच विजयी कसे होतात जे इच्छुक व विरोधक सध्या विरोध करत आहेत त्या विरोधाला वस्तुनिष्ठ व खरा आधार आहे का असा प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहे विकास झाला नाही असे फक्त इच्छुक व काही ठराविक विरोधक बोलत आहेत मात्र जनता जनार्दन विरोध झाला नाही असे बिलकुलच बोलताना दिसत नाही याचा अर्थ असा होतो की पंधरा वर्षांमध्ये प्रत्येक गावामध्ये विकासात्मक कामे झाली आहेत ही कामे होत असताना काही कामांना उशीर झाला असेल काही कामे साधारण दर्जाचे होत असतील तर काही कामे अर्धवट असतील ह्या गोष्टी 100% खऱ्या असतील मात्र त्याला आमदार संजय रायमुलकर हेच जबाबदार आहे असे म्हणणे माणुसकीच्या दृष्टीने खरे ठरणार नाही कारण ज्या गावांमध्ये काम होत आहे त्या गावातील लोकांची गाव पुढार्‍यांची जबाबदारी आहे की ठेकेदाराकडून काम चांगल्या दर्जाचे करून घेणे चुकीचे काम होत असेल तर त्याला विरोध करणे मात्र मेहकर मतदार संघात गेल्या काही दिवसापासून असे चित्र दिसून येत आहे की काही ठराविक लोकच विकास कामाच्या तक्रारी करतात मात्र ह्या तक्रारी केल्यानंतर पुढे त्या तक्रारीवर काय होते हे फक्त तक्रार करता व संबंधित ठेकेदार किंवा अधिकारी या तिघांनाच माहिती असते त्या तक्रारीवर कुठेही कारवाई होत नाही किंवा तक्रार करता अनेक वेळा आपली तक्रार मागे घेतात असे अनेक ठिकाणी दिसून आलेले आहे मग जर तक्रार करायची तर मागे का घेतात असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे मेहकर मतदार संघात आज रोजी प्रत्येक गावामध्ये जर गेले तर शंभर टक्के जरी नाही तरीसुद्धा 70 80 टक्के विकासात्मक कामे झालेली आहे हे बिलकुलही नाकारता येणार नाही राजकारणात विरोधात 100% असला पाहिजेत विरोधक असल्याशिवाय सत्ताधारी लोक नियमानुसार कामे करणार नाहीत ही गोष्ट साहजिक आहे मात्र काहीतरी विरोध करायचा व चर्चेत राहायचे हे कितपत योग्य आहे आपल्या गावचा जर विकास होत असेल तर राजकारण जात-पात धर्म या गोष्टी बाजूला ठेवल्या गेल्या पाहिजेत विकासाच्या मुद्द्यावर सर्व गावकऱ्यांनी व सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित येणे गरजेचे आहे केवळ राजकारण करायचे म्हणून विकासाला विरोध करणे हा माणुसकीला न शोभणारा विषय आहे एकच माणूस सतत निवडून येतो याचे आत्मचिंतन विरोधकांनी शंभर टक्के करण्याची गरज आहे दरम्यान मेहकर विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष आपापल्या परीने हालचाली करत आहेत मात्र एक महत्त्वाचा मुद्दा समोर येत आहे तो मात्र स्थानिक उमेदवारच हवा सध्याच्या परिस्थितीत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस जर सोडली तर उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार साहेब यांच्याकडे स्थानिक उमेदवार असताना सुद्धा बाहेरगावचे लोक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून व शरद चंद्र पवार साहेब गटाकडून प्रयत्न करताना दिसत आहेत स्थानिक पातळीवर स्थानिक उमेदवारच देण्याची गरज असल्याचा मुद्दा समोर येत आहे महाविकास आघाडीत मेहकरची जागा सोडण्यावरून व स्थानिक उमेदवारावरून चलबीचल सुरू आहे काहीही असले तरी सध्याच्या परिस्थितीत आमदार संजय रायमुरकर यांचे चोहोबाजूंनी पारडे जड असल्याचे दिसून येत आहे मात्र आमदार संजय रायमुलकर यांना सुद्धा 2024 ची विधानसभेची निवडणूक पाहिजे तेवढी सोपी जाईल असेही समजणे चुकीचे आहे मात्र ज्या माणसाने पंधरा वर्षात विविध लोकांची कामे केली आहेत सुखदुःखात अहोरात्र उपस्थित राहिले आहेत अनेकांच्या अडचणी सोडविले आहेत कोट्यावधीची विकास कामे केली आहेत त्या माणसासाठी निवडणूक जड जाणे बिलकुलच शक्य नाही मात्र तरीसुद्धा सावध असणे कधीही चांगले असते कामे करत असताना एक दोन कामे झाले नाही म्हणून कोणी जरी नाराज होत असेल तरीसुद्धा कालांतराने पुन्हा एकत्रित येऊन काम करण्याची गरज असते हेही तेवढेच खरे आहे अनेक वेळा वेगवेगळ्या चावडीवर शहरांमध्ये ठिकठिकाणी हॉटेलवर चौका चौकामध्ये राजकारणाच्या चर्चा सुरू असतात या चर्चेतून असे दिसून येत आहे की विरोधकाच्या तोंडूनही कळत नकळत आमदार संजय रायमुलकर हा माणूस चांगला आहे असा शब्द शंभर टक्के निघतो ह्या गोष्टी प्रत्येकाला माहित आहे मात्र आपण विरोधक आहोत आपण असे म्हणायला नको असे सुद्धा अनेक जण बोलतात चित्र काहीही असले ,राजकारण काहीही असले आरोप प्रत्यारोप जरी झाले तरी आमदार संजय रायमुलकर हा माणूस कोणत्याही व्यक्तीला तो कोणत्याही जाती धर्माचा असो कोणत्याही राजकीय पक्षाचा असतो आमदार संजय रायमुलकर हे आपलेसे वाटतात हे सत्य नाकारून बिलकुल चालणार नाही मात्र प्रत्येक राजकारणी लोकांची काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते त्यामुळे विरोधात जर बोलले नाही तर पक्षामध्ये आपले अस्तित्व राहणार नाही त्यामुळे अनेक जण विरोधात सुद्धा बोलत असतात व ते साहजिक सुद्धा आहे मात्र मेहकरची परिस्थिती महायुती पक्ष जर सोडला तर इतर पक्षात गोंधळाचीच दिसून येत आहे एवढे मात्र खरे

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!