संजय रायमुलकर व रंजनाताई रायमुलकर यांनी महिला वारकरी मंडळाचा मानसन्मान करून दिले वारकरी साहित्य सप्रेम भेट वारकरी लोकांना कधीच कमी पडू देणार नाही धार्मिकतेमुळेच आज हिंदुत्व जिवंत आहे – संजय रायमुलकर आम्ही नेहमी धार्मिक कार्यात पुढाकार घेत आलो आहोत व यापुढेही पुढाकार घेऊ – रंजनाताई रायमुलकर महिला वारकरी मंडळांनी मानले रायमुलकर परिवाराचे आभार वारकरी महिलांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण

 

मेहकर ( उध्दव फंगाळ)

संजय रायमुलकर व रंजनाताई रायमुलकर यांनी महिला वारकरी मंडळांचा मानसन्मान करून महिला वारकरी मंडळाला साहित्य सप्रेम भेट दिले यावेळी रायमुलकर साहेब म्हणाले की आपला भारत देश हा हिंदू संस्कृतीचा देश आहे या भारत देशामध्ये जुन्या काळात देव दानव होऊन गेलेले आहेत रामायण महाभारत सुद्धा होऊन गेलेले आहेत भारत देशाला हिंदू संस्कृती आहे वारकरी लोकांमुळेच आज रोजी आपल्या भारत देशात हिंदुत्व जिवंत आहे विविध धार्मिक कार्यक्रमामुळे भक्तिमय व आध्यात्मिक वातावरण निर्माण होत असते व अशा कार्यक्रमातून एक सकारात्मक विचार जनतेमध्ये पसरत असतो वारकरी मंडळांना कधीही कमी पडू देणार नाही वारकरी लोकांसाठी मेहकर येथे जवळपास साडेतीन कोटी रुपयांचे वारकरी भवन लवकरच तयार होत असून वारकऱ्यांच्या सेवेमध्ये ते वारकरी भवन लवकरच प्रदान करण्यात येणार असल्याचे सुद्धा संजय रायमुलकर यांनी सांगितले यावेळी रंजनाताई रायमुलकर म्हणाल्या की आमचा परिवार हा सुरुवातीपासूनच वारकरी परिवार आहे वारकऱ्यांची शिकवण आम्हाला सासू-सासर्‍यापासूनच मिळालेली आहे आमच्या घरात व कुटुंबात नेहमीच धार्मिक वातावरण राहिलेले आहे त्यामुळे आम्हाला धार्मिकतेची जाण असून आम्ही आत्तापर्यंत वारकरी लोकांना भरपूर सहकार्य केलेले आहे व यापुढेही भरपूर सहकार्य करत राहू असे रंजनाताई रायमुलकर म्हणाल्या यावेळी हिवरा आश्रम येथील प .पू.शुकदास महाराज महिला दिंडी मंडळ हिवरा आश्रम यांना संजय रायमुलकर व रंजनाताई रायमुलकर यांनी साहित्य सप्रेम भेट दिले तर महिला मंडळातील काही महिलांनी सुद्धा संजय रायमुलकर व रंजनाताई रायमुलकर यांचे आभार मानून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत यावेळी प.पु शुकदास महाराज महिला दिंडी मंडळ हिवरा आश्रमच्या
सौ.वनिता वसंत सांबपुरे
सौ.मीना विठ्ठल भाकडेताई
सो. सीमा ठाकरे
सौ. जयश्री भारस्कर
सौ. मीना इंगळे
सौ. वंदना इंगळे
सौ. वैशाली तोडकर
सौ. वैशाली देशमुख
सौ. सवडतकर ताई
सौ. न्हावी ताई
सौ. डाखोरे ताई
सौ. शेळके ताई
सौ. शिंदे ताई
सौ. जाधव ताई उपस्थित होत्या

Previous article
Next article

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!