संजय रायमुलकर साहेब यांनी पोलिसांचा मान सन्मान करून आहेर करून अश्रू नयनांनी केले रवाना तीन वर्षात जिव्हाळ्याचे संबंध तयार झाल्याने रायमुलकर परिवार पोलिसांसाठी झाला भाऊक पोलीसही रायमुलकर परिवारासाठी ढसाढसा रडले महाराष्ट्रातील पोलिसांना व सर्वांनाच जीव लावणारा एकमेव माणूस म्हणजे संजय रायमुलकर साहेब पोलिसांनी केल्या भावना व्यक्त आम्ही ड्युटी करत असताना एखाद्या भावाप्रमाणे रायमुलकर साहेबांसोबत राहिलो मात्र आज सोडून जात आहोत याची खंत आहे

 

मेहकर ( उध्दव फंगाळ)

दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये रक्ताच्या नात्याबरोबरच इतर काही नाती एवढी आपल्याशी जवळीक करून जातात की ती नाती रक्ताच्या नात्यापेक्षाही त्या नात्यांचा आदर किंवा जिव्हाळा निर्माण होत असतो असाच प्रकार संजय रायमुलकर साहेब यांच्या संदर्भात आज दिसून आला ज्यावेळेस शिंदे शिवसेना पक्षाचा उठाव झाला होता त्यावेळेस शिंदे शिवसेना पक्षाचे जेवढे आमदार आहेत त्या आमदारांना पोलीस संरक्षण देण्यात आले होते याच पार्श्वभूमीवर मेहकरचे तत्कालीन आमदार व सध्याचे माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांना सुद्धा पोलीस संरक्षण देण्यात आले होते या पोलीस संरक्षणामध्ये स्कॉटिंग पोलीस वाहनासह सहा पोलीस कर्मचारी कार्यरत होते गेल्या अडीच तीन वर्षाच्या काळामध्ये संजय रायमुलकर साहेब व कार्यरत असलेल्या पोलिसांमध्ये एवढे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले होते की पोलीस व आमदार हे नातं बाजूला सारून एक जीवाभावाचं व कौटुंबिक नातं रायमुलकर साहेब यांच्या परिवारामध्ये व कार्यरत असलेल्या पोलिसांमध्ये निर्माण झाले होते अडीच तीन वर्षाच्या काळात सुखदुःख अडीअडचणी पाऊस वारा रात्रंदिवस मेहकर मतदार संघात फिरणे या सर्व घडामोडी मध्ये जे पोलीस संजय रायमुलकर साहेब यांच्या सोबत होते त्यांच्यामध्ये घरोबा निर्माण झाला होता रायमुलकर साहेब या पोलिसांप्रती अतिशय जिवाभावाप्रमाणे किंवा आपल्या कुटुंबातीलच हे सर्व एक सदस्य आहेत असे त्यांना वागणूक देत होते अगदी चहा पाण्यापासून तर जेवणापर्यंत रायमुलकर साहेब त्या पोलिसांची रात्री उशिरापर्यंत विचारपूस करत होते अनेक वेळा रायमुलकर साहेबांनी या पोलिसांना आपल्या जवळ बसून आपल्या घरात जेऊ घातले होते तर आपल्या सोबत ड्युटी करत असताना कुठेही पोलिसांना पोलिसा सारखी वागणूक बिलकुलही रायमुलकर साहेब यांनी दिलेली नाही अगदी जीवाभावाचे लोक म्हणून त्यांनी दैनंदिन जीवनात त्यांच्यासोबत असलेल्या पोलिसांना वागणूक दिली आहे रायमुलकर साहेब यांच्या स्कॉटिंगमध्ये किंवा संरक्षणांमध्येच आमची नियुक्ती करा असे बुलढाणा जिल्ह्यातील अनेक पोलिसांकडून मागणी येत होती कारण रायमुलकर साहेबांचा स्वभाव हा न समजणारा आहे रायमुलकर साहेब यांनी कधीच आपल्या अंगात आमदारकी आणली नाही व जर आमदारकी आणली असेल तर ती चांगल्या कामासाठीच आणलेली आहे हे सर्व मतदार संघातील मायबाप जनतेला माहित आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अगोदर आमदारांना दिलेले पोलीस संरक्षण काढून घेतले आहे त्यानुसार रायमुलकर साहेब यांचे पोलिस संरक्षण सुद्धा काढून घेण्यात आले आहेत या पोलिसांना निरोप देत असताना पोलीस ढसाढसा रडले आहेत तर संजय रायमुलकर साहेब त्यांच्या धर्मपत्नी रंजनाताई मुलगी नयनताई सून शामलीताई यांच्या डोळ्यांमध्ये सुद्धा अश्रू आले रायमलकर साहेब यांनी कार्यरत असलेल्या
चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश वाकडे
नाईक पोलीस कॉन्स्टेबल पंजाबराव शेळके
नाईक पोलीस कॉन्स्टेबल प्रविण वाघ चालक पोलीस कॉन्स्टेबल विश्वास मोरे पोलीस कॉन्स्टेबल राम आत्तरकर व पोलीस कॉन्स्टेबल प्रफुल्ल देशमुख या
पोलिसांचा मानसन्मान आहेर करून तर नयनताई यांनी सर्व पोलिसांचे औक्षण करून स्वागत केले हा निरोप समारंभाचा कार्यक्रम अगदी भावनिक व कौटुंबिक स्वरूपाचा होता तर यावेळी उद्धव फंगाळ नागेश इंगळे अभि निकष नागेश कांगणे विलास आखाडे सचिन मापारी ओम मापारी गणेश यांना सुद्धा अश्रू अनावर झाले होते एखाद्या कुटुंबातील मुलगा किंवा भाऊ जर बाहेरगावी नोकरीला किंवा बाहेर देशात जात असेल तर ज्याप्रमाणे घरगुती कुटुंबात भावनिक वातावरण तयार होत असते त्याचप्रमाणे या पोलिसासंदर्भात रायमुलकर परिवारामध्ये भावनिक वातावरण तयार झाले होते हा प्रसंग महाराष्ट्रातील एकमेव असलेले संजय रायमुलकर साहेब व पोलिसासंदर्भात असावा असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही नाहीतर दैनंदिन जीवनात अनेक ठिकाणी आपण पाहत असतो की अनेक पोलीस आमदाराकडून ड्युटी बदलून घेण्यासाठी अधिकाऱ्याकडे मागणी करत असतात मात्र रायमुलकर साहेबासंदर्भात पाहिले तर रायमुलकर साहेबाकडे ड्युटी करण्यासाठी अनेक पोलीस आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगत असतात हे फक्त एक माणुसकीचे नाते एक जीवाभावाचे व जिव्हाळ्याचे नाते तयार झाल्यामुळेच घडलेले आहे पोलिसांना रायमुलकर साहेबाकडची ड्युटी सोडत असताना अतिशय दुःख झाले सर्वच पोलीस अक्षरशः ढसाढसा रडले तर रायमुलकर साहेबही आपले अश्रू आवरू शकले नाही एवढा माणुसकीबाज आमदार महाराष्ट्रात होणे नाही एवढे मात्र खरे

Previous article
Next article

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!