आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्या लवकरच मार्गी लावणार – संजय रायमुलकर साहेब आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतली संजय रायमुलकर साहेब यांची भेट त्याच वेळी लावला आरोग्यमंत्र्याला फोन मागण्या लवकरच मार्गी लागण्याची शक्यता ऑन द स्पॉट फैसला

 

मेहकर (उध्दव फंगाळ)

मेहकर मतदार संघात कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या गेल्या अनेक वर्षापासून शासनाकडे विविध मागण्या प्रलंबित आहेत आरोग्य कर्मचाऱ्याकडून लोकशाही मार्गाने वेळोवेळी आंदोलन सुद्धा करण्यात आले शासनाकडून त्यांना आश्वासन सुद्धा देण्यात आलेले आहे मार्च 2024 मध्ये जीआर सुद्धा काढण्यात आलेला आहे मात्र त्या जीआरची अद्यापही अंमलबजावणी झालेली नसल्याने मेहकर मतदार संघातील विशेष करून मेहकर तालुक्यातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी विकास पुरुष माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांची 23 फेब्रुवारी रोजी मेहकर येथील विश्रामगृहावर भेट घेतली व आपल्या मागण्या रायमुलकर साहेबाकडे मांडल्या यावेळी रायमुलकर साहेबांनी सर्वांचे म्हणणे अगदी शांततेने ऐकून घेतले तर क्षणाचाही विलंब न लावता त्याच वेळी आरोग्य मंत्री यांना फोन केला व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी समस्या व मागणी संदर्भात चर्चा केली या संदर्भात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्या लवकरच मार्गी लावणार असल्याचे आरोग्य मंत्री यांनी रायमुलकर साहेब यांना सर्व कर्मचाऱ्यासमोर आश्वासन दिले येत्या चार ते पाच दिवसात मुंबई या ठिकाणी सर्व आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक असल्याचे सुद्धा आरोग्य मंत्री यांनी सांगितले त्यावेळी संजय रायमुलकर साहेब या बैठकीला आवर्जून उपस्थित राहणार असून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मंजूर करून घेणार असल्याचे रायमुलकर साहेब यांनी सांगितले आरोग्य कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहे कोरोनाच्या काळामध्ये या कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची परवा न करता आरोग्य सेवा दिलेली आहे तर दैनंदिन जीवनातही हे सर्व आरोग्य कर्मचारी वेळप्रसंगी आपल्या कुटुंबाकडेही दुर्लक्ष करून रुग्णांना सेवा देत असतात मात्र शासनाकडून पाहिजे तसे सहकार्य या कर्मचाऱ्यांना गेल्या काही वर्षापासून मिळत नाही त्यामुळे हे कर्मचारी वेळोवेळी शासनाकडे लोकशाही मार्गाने मागणी करतात मात्र त्यांचे प्रश्न काही सुटत नाही अशा परिस्थितीत आपल्या मागण्या कोण पूर्ण करू शकतो याची जाणीव कर्मचाऱ्यांना असल्यामुळे आरोग्य कर्मचारी यांनी माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्याकडे धाव घेतली आपले म्हणणे सविस्तर रायमुलकर साहेब यांच्यासमोर मांडले या संदर्भात रायमुलकर साहेब यांनी करतो पाहतो होऊन जाईल बोलतो असे कोणतेही आश्वासन या कर्मचाऱ्यांना दिले नाही तर त्याचवेळी ऑन द स्पॉट फैसला म्हणून आरोग्यमंत्र्यांना फोन केला तर लवकरच मुंबई येथे बैठक होणार असून रायमुलकर साहेब स्वतः या प्रकरणात लक्ष घालून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्या लवकरच सोडविणार असल्याचे रायमुलकर साहेब यांनी सांगितले यावेळी
एस.डी.लंबाटे,एम.टी.जुगाडे,ए .टी.लोखडे,जी.एन.डूकरे,एस.आर.सोळके ,एस.आर.
डाखोरे .पी.जी.वरनकर
ए.एस.सोनुने,एस.आर.
सिरसाट, एकनाथ भाऊ
मुरलीधर लाभाडे साहेब, धनंजय रौदंळे
गजानन बोरकर
प्रभाकर लाभाडे
शंकर मोघाड
पंडीत गायकवाड आदी कर्मचारी उपस्थित होते

Previous article
Next article

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!