विकासाच्या दृष्टीने डोणगाव नगरपंचायत झाली पाहिजे यासाठी लवकरच प्रस्ताव सादर करणार – संजय रायमुलकर डोणगाव ग्रामपंचायतला संजय रायमुलकर यांची भेट विविध विषयावर महत्त्वाची चर्चा डोणगावचा पाणी प्रश्न सुद्धा लवकरच मार्गी लावण्यासाठी पेनटाकळी धरणावरून व्यवस्था करण्यासाठी योजना करणार डोणगावची लोकसंख्या व क्षेत्रफळ पाहता डोणगाव नगरपंचायत होण्याची गरज

 

मेहकर (उध्दव फंगाळ)

मेहकर तालुक्यातील डोणगाव ही ग्रामपंचायत बुलढाणा जिल्ह्यात जवळपास सर्वात मोठी ग्रामपंचायत मानली जाते या ग्रामपंचायतीची लोकसंख्या व क्षेत्रफळ दिवसेंदिवस वाढतच आहे अनेक लोक या ठिकाणी वास्तव्यास येत आहे त्यामुळे लोकांच्या विकासाच्या अपेक्षा सुद्धा वाढल्या आहेत ग्रामपंचायत स्तरावर पाहिजे तेवढ्या योजना राबविल्या जात नाहीत किंवा विकास कामासाठी ग्रामपंचायत स्तरावर निधी कमी पडतो त्यामुळे डोणगाव नगरपंचायत होण्यासाठी लवकर शासनाकडे प्रस्ताव सादर करणार असल्याचे विकास पुरुष माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी सांगितले संजय रायमुलकर साहेब यांनी 22 फेब्रुवारी रोजी डोणगाव ग्रामपंचायतला भेट दिली यावेळी जिल्हा परिषदचे माजी सभापती राजेंद्रजी पळसकर डोणगाव ग्रामपंचायतचे सरपंच शिवचरण पाटील आखाडे उपसरपंच श्याम प्रल्हाद इंगळे व ग्रामपंचायत सदस्य जुबेर खान संजय जमदाडे रमेश काळे सैदनूर भाई आतार हमीद भाई कुरेशी छोटू खोडके व आणि संदीप भाऊ पांडव जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रवादीचे नेते गजानन भाऊ पळसकर आणि ग्रामपंचायत सर्व कर्मचारी उपस्थित होते यावेळी संजय रायमुलकर साहेब यांचा ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार करण्यात आला. रायमुलकर साहेब पुढे म्हणाले की सध्या डोणगावला मादणी या गावच्या तलावावरून पाणीपुरवठा होत आहे मात्र वाढती लोकसंख्या पाहता त्या तलावावरून सुद्धा पाहिजे तेवढा पाणीपुरवठा डोणगावला मिळत नाही त्यामुळे पाणीटंचाई निर्माण होत आहे अशा परिस्थितीमध्ये पेनटाकळी धरणातून डोणगावला पाणीपुरवठा झाला पाहिजे डोणगावात पाणीटंचाई राहिली नाही पाहिजेत लोकांना वेळेवर पाणी मिळाले पाहिजेत यासाठी लवकरच प्रयत्न करणार असल्याचे सुद्धा रायमुलकर साहेब यांनी सांगितले याबरोबरच सरपंच चरण पाटील आखाडे यांनी डोणगावच्या विकासात्मक कामासाठी संजय रायमुलकर साहेब यांच्याकडे वेगवेगळ्या विकासात्मक कामाची मागणी केली तर आपण माजी आमदार जरी असले तरीसुद्धा सरकार आपलेच आहे त्यामुळे निधी आणण्यासाठी काही अडचण येणार नाही तरी डोणगाववाशीयांच्या हितासाठी आपण शासनाकडे निधीसाठी पाठपुरावा करावा अशी मागणी केली यावर संजय रायमुलकर म्हणाले की डोणगावच्या विकासासाठी मी कुठेही कमी पडणार नाही डोणगाव नगरपंचायत झाले पाहिजे डोणगावला व्यवस्थित पाणीपुरवठा झाला पाहिजे त्याचबरोबर इतरही विकासात्मक कामे मोठ्या प्रमाणात करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असून डोणगाव वाशी यांच्या हितासाठी कुठेही निधी कमी पडू देणार नाही असेही संजय रायमुलकर साहेब यांनी सांगितले

Previous article
Next article

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!