युवकांचा मोबाईलकडे वाढलेला कल भविष्यासाठी घातक – ऋषीभाऊ जाधव मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्या वतीने आयोजित बक्षीस वितरण कार्यक्रमाला ऋषीभाऊ जाधव व नीरज भाऊ रायमुलकर यांची प्रमुख उपस्थिती मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्या वतीने आयोजित कार्यक्रमामुळे युवकांमध्ये बालपणापासूनच समाज जागृती होत आहे सध्या स्पर्धेचे युग असून विद्यार्थी व युवकांनी जास्तीत जास्त वाचन केले पाहिजे

 

मेहकर ( उध्दव फंगाळ)

मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्या वतीने मा जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या जन्मोत्सवानिमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम 27 फेब्रुवारी रोजी कृषी लॉन या ठिकाणी संपन्न झाला या कार्यक्रमाला युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ऋषीभाऊ जाधव युवा नेते नीरज रायमुलकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यावेळी आयोजकांनी आलेल्या सर्व मान्यवरांचा मानसन्मान करून सत्कार केला यावेळी मार्गदर्शन करताना युवा सेनेचे ऋषीभाऊ जाधव म्हणाले की मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने आयोजित केलेली निबंध स्पर्धा ही विद्यार्थी व युवकांना एक आदर्श निर्माण करणारी बाब आहे समाजात किंवा आपल्या महापुरुषांनी इतिहास काळात जो संघर्ष केला त्या संघर्षाची माहिती विद्यार्थ्यांना व युवकांना आपल्या जीवनात सुरुवातीपासूनच व्हावी विद्यार्थ्यांचे जीवन यशस्वी व्हावे सर्व क्षेत्रातील माहितीचे ज्ञान युवक व विद्यार्थ्यांना असले पाहिजेत हा कार्यक्रम विद्यार्थी व युवकांमध्ये ज्ञानाची जनजागृती करणार आहे या स्पर्धेला चांगला प्रतिसादही मिळत असल्याचे ऋषीभाऊ जाधव यांनी सांगितले ऋषीभाऊ जाधव पुढे म्हणाले की आजकालचा विद्यार्थी व युवा वर्ग मोबाईलकडे जास्त वळत आहे रील बनवणे फेसबुक इंस्टाग्राम अशा मोबाईल वरील कार्यक्रमाकडे युवक व विद्यार्थ्यांचा वाढता कल हा येणाऱ्या भविष्यासाठी घातक असल्याचे सुद्धा ऋषीभाऊ जाधव यांनी सांगितले युवकांनी आपला वेळ रील किंवा मोबाईलच्या इतर काही दिशाहीन करणाऱ्या गोष्टींमध्ये न वाया घालविता मोबाईलचा वापर हा चांगल्या गोष्टीसाठी केला पाहिजेत असे आवाहनही ऋषीभाऊ जाधव यांनी यावेळी केले

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!