मेहकर (उध्दव फंगाळ)
मेहकर परिसरासह लोणार तालुक्यातही बाहेरगाव काही लोक येत आहेत विविध कामानिमित्त हे लोक येत असले तरीसुद्धा अनेक लोकांजवळ मूळ कागदपत्र किंवा तो कोणत्या गावचा रहिवासी आहे याचा पुरावा नसल्याचे दिसून येत आहे या संदर्भात ऍडव्होकेट गजानन ठाकरे साहेब यांनी संबंधित अधिकाऱ्याकडे वेळोवेळी अशा लोकांची चौकशी करण्याची मागणी केली होती मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी या संदर्भात पाहिजे तशी पावले उचलली नाही त्यामुळे विदर्भ सत्यजित लाईव्ह न्युजचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी एडवोकेट गजानन ठाकरे यांची मुलाखत घेऊन या प्रकरणाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला होता याच पार्श्वभूमीवर सन्माननीय माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी एडवोकेट गजानन ठाकरे यांच्या मागणीची व विदर्भ सत्यजित लाईव्ह च्या बातम्या ची दखल घेऊन संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना ताबडतोब बाहेर गावावरून येणाऱ्या लोकांची चौकशी करा त्यांची कागदपत्रे तपासा व जर खोटी कागदपत्रे असतील तर ताबडतोब नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत तर शासनाकडे सुद्धा या संदर्भात कारवाईसाठी मागणी करणार असल्याचे सन्माननीय माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी सांगितले
मेहकर व लोणार तालुक्यात गेल्या काही दिवसापासून अनेक लोक बाहेर गावावरून येत आहेत हे लोक मेहकर लोणार तालुक्यात वेगवेगळे व्यवसाय करतात काही लोक काम धंदा करण्यासाठी येत आहेत याबद्दल काही दुमत नाही मात्र अनेक लोकांजवळ मूळ कागदपत्रच नसल्याचे दिसून येत आहे या संदर्भात ऍडव्होकेट गजानन ठाकरे साहेब यांनी वेळोवेळी महसूल विभाग पोलीस विभाग नगरपालिका विभाग यांच्याशी संपर्क केलेला आहे मात्र या विभागाकडून कोणतीही गंभीरतेने दखल घेण्यात आली नाही यासंदर्भात गजानन ठाकरे साहेब यांनी विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज ला मुलाखत देऊन कारवाई करण्याची मागणी केली होती. मेहकर सह अनेक ठिकाणी अनेक वेळा चोऱ्या इतर काही विपरीत घटना घडत आहेत मात्र या घटना घडत असताना आरोपीचा पत्ताच पोलिसांना लागत नाही तर जे लोक मेहकर लोणार तालुक्यात बाहेर गावावरून आले आहे त्यांच्याजवळ रहिवासी असल्याचा कोणताच पुरावा नसल्याचे एडवोकेट गजानन ठाकरे यांच्या निदर्शनास आले होते या संदर्भात सन्माननीय माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेतली असून मेहकरचे तहसीलदार निलेश मडके साहेब तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना सदर प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना केल्या असून तहसीलदार निलेश मडके साहेब यांनी एक समिती नेमली आहे तर सोमवारपासून ही समिती मेहकर शहर तसेच तालुक्यात सर्व ठिकाणी बाहेर गावावरून येणाऱ्या लोकांची चौकशी करणार आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या सेतू मधून अशा लोकांना आधार कार्ड पॅन कार्ड व इतर काही कागदपत्रे काढून देण्याचा प्रकार घडत असल्याची चर्चा आहे त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सुद्धा होणार असल्याचे दिसून येत आहे
