मेहकर (उध्दव फंगाळ)
सन २०२४/२५ साठी आमदार संजय रायमुलकर यांनी प्रस्तावित केलेल्या मेहकर तालुक्यातील अनुसूचित जाती जमाती वस्त्यांमधील विविध २७ गावांमधील ३६ सिमेंट रस्त्यांसाठी दोन कोटींच्या बांधकामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.
संजय रायमुलकर यांनी मेहकर ,लोणार तालुक्यातील विविध गावांमधील अनुसूचित जाती जमाती वस्त्यांमधील सिमेंट रस्ते, नाली बांधकाम, पेव्हर ब्लॉक आदी कामे प्रस्तावित केली होती. जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने तारीख पाच मार्च रोजी प्रसृत केलेल्या प्रशासकीय मान्यता आदेशान्वये ही कामे पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अंत्री देशमुख , अंध्रुड ,कल्याणा, सावत्रा ,वरूड, सोनाटी येथे प्रत्येकी दोन रस्ते, डोणगाव येथे तीन रस्त्यांची कामे होणार आहेत. त्याचप्रमाणे मांडवा समेत डोंगर, मोळा ,बेलगाव ,वरदडा , जनुना ,सारंगपूर वाडी, गौंढाळा ,लोणी काळे ,निंबा, बारडा ,नागझरी खुर्द, उसरण, लोणी गवळी ,सुकळी ,नागापूर ,भोसा ,बाभुळखेड, बरटाळा आदी मेहकर पंचायत समिती अंतर्गतच्या गावांमध्ये चार ते सात लाख रुपये खर्चाची रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण ,नालीबांधकाम, पेव्हर ब्लॉक आदी बांधकामांना प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. एक कोटी ९९ लाख ५८ हजार रुपये रुपयांच्या सदर बांधकामांना समाज कल्याण विभागाकडून मंजुरी देण्यात आली आहे.
