मेहकर (उध्दव फंगाळ माऊली)
मेहकर तालुक्यातील डोणगाव येथे 10 मार्च रोजी सकाळी चार ते पाच वाजताच्या सुमारास भाजी मंडी मध्ये अचानक आग लागली या आगीमध्ये गोरगरिबांची भाजीपाल्याची व इतर काही अशी नऊ दुकाने जळून खाक झाली यामध्ये दररोज व्यवसाय करणाऱ्या गोरगरीब दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले गावकऱ्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले जवळपास 20 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे सदर प्रकार सन्माननीय माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांना माहिती होताच त्यांनी दैनंदिन कार्यक्रम बाजूला सारून जी दुकाने जळून खाक झाली आहे त्या ठिकाणी जाऊन ताबडतोब पाहणी केली ज्या लोकांची दुकाने जळाली आहेत ती लोकं अतिशय गरीब आहेत दररोज भाजीपाला घेऊन किंवा इतर काही वस्तू घेऊन विक्री करत होते आपला उदरनिर्वाह या दुकानदाराचा याच विक्री व्यवसायावर होता मात्र अचानक आग लागल्याने सर्व दुकाने व त्या दुकानात असलेला माल जळून खाक झाला त्यामुळे दुकानदारावर आर्थिक संकट कोसळले आहे जवळपास नऊ जणांचे यामध्ये नुकसान झाले आहे ज्यांची दुकाने जळाली आहेत ते अतिशय गरीब कुटुंबातील आहेत दररोज भाजीपाल्याचा माल घेऊन किंवा इतर काही माल घेऊन विक्री करत होते व यावरच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत होते मात्र अचानक सर्व खाक झाल्याने सर्व दुकानदार हतबल झाले होते दुसऱ्या दिवशी माल भरण्यासाठी सुद्धा यांच्याजवळ पैसे नव्हते अशा बिकट परिस्थितीमध्ये या दुकानदाराला सध्याच्या परिस्थितीत थोडीफार का होईना मदत मिळाली पाहिजेत व नेहमी कोणताही विचार न करता कोणत्याही जाती धर्माचा राजकीय डावपेच न खेळता नुकसानग्रस्तांना व गोरगरिबांना मदत करणारा माणूस म्हणजे संजय रायमुलकर साहेब यांनी ताबडतोब डोणगाव या ठिकाणी जाऊन ज्या दुकानदाराची दुकाने जळाली होती त्यांना बोलावून घेतले सर्व परिस्थितीची माहिती घेतली व ताबडतोब ज्यांची दुकाने जळाली आहेत त्या सर्वांना प्रत्येकी दहा हजार रुपये स्वतःच्या वैयक्तिक खिशातून नगदी स्वरूपात दिले आहे हे दहा हजार रुपये वेळेवर मिळाल्याने व आपल्या वेळेवर कामी पडतील या भावनेमुळे सर्व दुकानदारांनी रायमुलकर साहेबांचे आभार मानले रायमुलकर साहेब हे असे व्यक्तिमत्व आहे ही मदत करत असताना ते जात पात धर्मपंथ कधीही पाहत नाहीत राजकीय पक्ष किंवा राजकीय डावपेच कधीच खेळत नाहीत गरिबाला आपल्याकडून काहीतरी मदत मिळाली पाहिजेत गरीबाचे भले झाले पाहिजेत कोणीही अडचणीत येऊ नये अशी भावना त्यांची नेहमीच राहिलेली आहे व हे सर्व लोकांना माहिती सुद्धा आहे केवळ आश्वासन न देता करू पाहू होऊन जाईल अशी भाषा न वापरता रायमुलकर साहेब प्रत्यक्ष कृती करत असतात हे सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे त्यांनी नुकसानग्रस्तांना ताबडतोब मदत केली व शासनाकडूनही मदत मिळण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार असल्याचे रायमुलकर साहेब यांनी यावेळी सांगितले यावेळी माजी कृषी सभापती राजू मामा पळसकर हेमराज शर्मा डॉक्टर उल्हामाले यांच्यासह शिवसेनेचे इतरही पदाधिकारी उपस्थित होते