मेहकर(उध्दव फंगाळ) शासनाच्या वतीने शेतकरी वर्ग, गोरगरीब मजूर वर्ग ,ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणूस यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या आहे या योजना लाभदायक आहेत मात्र काही ठिकाणी या योजनेचा बट्ट्याबोळ होताना दिसत आहे शासनाकडून अनेक गावांमध्ये विहिरी घरकुल गोठे या योजना सुरू करण्यात आल्या आहेत मात्र योजना मंजूर करत असताना किंवा तुमची योजना मंजूर करून देतो अशा पद्धतीने काही एजंट लाभार्थ्याकडून पैसे घेत असल्याच्या चर्चा व अनेक वेळा वस्तूस्थिती सुद्धा समोर आल्याचे बोलल्या जात आहे यामध्ये एजंटच जबाबदार असेल असे दिसत नाही यामध्ये काही अधिकारी कर्मचारी यांचा सुद्धा सहभाग असल्याची जोरदार चर्चा मेहकर मतदारसंघात आहे अशा बिकट परिस्थितीमध्ये मेहकर व लोणार तालुक्यातील शिंदे शिवसेना पक्ष आक्रमक झाला असून अशा संदर्भातल्या तक्रारी शिवसेना जनसंपर्क कार्यालय येथे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे मेहकर, लोणार तालुक्यातील अनेक गरजू व्यक्तींनी शासकीय विहिरी घरकुल गोठा यासाठी पंचायत समितीतील काही घटकांनी व इतर एजंटांनी मागणी केल्यावरून मोठ्या प्रमाणात पैसे दिले असल्याच्या तोंडी तक्रारी आहेत. अशा ग्रामीण भागातील नागरिकांनी आपल्या तक्रारी शिवसेना कार्यालय मेहकर येथे त्वरित सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
वास्तविकत: शासनाच्या योजनांचा ग्रामीण भागातील गरजू व्यक्तींना लाभ व्हावा यासाठी अनेक वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत. केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव आणि माजी आमदार संजय रायमुलकर यांच्याकडे दोन्ही तालुक्यातील काही व्यक्तींनी शासकीय विहिरी, घरकुल, गोठा यासाठी
पंचायत समितीतील काही घटकांनी व इतरही काही एजंटांनी मागणी केल्यावरून रोख रक्कम दिली आहे ,अशा तोंडी तक्रारी मोठ्या प्रमाणावर आलेल्या आहेत. येत्या २८ मार्च रोजी लोणार पंचायत समितीची तर २९ मार्च रोजी मेहकर पंचायत समितीची वार्षिक आमसभा आयोजित आहे. त्या दृष्टीने संबंधिताची प्रकरणे न्याय मिळवून देऊन निकाली काढण्यासाठी संबंधितांनी आपल्या तक्रारी पंचायत समिती आणि शिवसेना कार्यालय, मेहकर येथे विलास आखाडे यांचेकडे त्वरित सादर करण्याचे आवाहन शिवसेनेचे मेहकर तालुकाप्रमुख सुरेशतात्या वाळूकर व लोणार तालुकाप्रमुख भगवानराव सुलताने यांनी केले आहे. दोन्ही आमसभांना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि माजी आमदार संजय रायमुलकर उपस्थित राहणार आहेत.