मेहकर (उध्दव फंगाळ) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभागचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस संदिप गवई व त्यांचे सहकारी व इतर अनेक लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश केला होता आणी संघटनेच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्र राज्य भरातून पाठिंबा दिला होता परंतू राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कुठले ही नेते व प्रत्येक जिल्ह्यातील लोक सामाजिक न्याय विभाग ला विश्वासात घेत नसतं त्यामुळे संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांची नाराजी दर्शवत आसत त्यामुळे तथागत ग्रुपच्या शिष्टमंडळाने सर्वांनच्या सहमतीने या पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे व यापुढे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना कुठल्या ही पक्षाला पाठिंबा देणार नाही आणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून बाहेर पडून संघटना महाराष्ट्र राज्यात स्वतंत्र काम करणार आहे येणार्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका, स्वराज्य संस्थाच्या निवडणुका स्वबळावर संपुर्ण महाराष्ट्र राज्य भरातून लढणार आहे.
असे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सांगण्यात आले यावेळी संदिप गवई, कुणाल माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र राज्य सरचिटणीस व चिटणीस या पदाचा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पंडित कांबळे यांच्याकडे राजीनामे स्वपुर्द केले आहे. तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना संपुर्ण महाराष्ट्र राज्यात सामाजिक कार्य करणारी गरजु गरीब लोकांनच्या मदतीसाठी धावून जाणारी, प्रत्येक समाजाला धरुन चालणारी ही संघटना आहे. संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांच्या नेतृत्वावर पूर्णपणे विश्वास असून त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पदाधिकारी व कार्यकर्ते व महिला आघाडी यांनी पाठिंबा काढुन घेतला आहे व संघटनेचे कार्य व संघटना वाढीसाठी पर्यंत्न करतील व एका निष्ठेने काम करू असे मत संदिप गवई यांनी यावेळी सांगितले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.