मेहकर वकील संघाच्या ग्रंथालय कक्षासाठी ५० लाखांचा निधी देणार – माजी आमदार संजय रायमुलकर जिल्हा व सत्र न्यायालयासाठी संजय रायमुलकर साहेब यांनी भरपूर मदत केली – अँड.विनय सावजी

 

मेहकर ( उध्दव फंगाळ )

दीर्घकाळ मोठा संघर्ष करून जिल्हा व सत्र न्यायालयाची आपण मेहकर येथे स्थापना केली. मेहकर वकील संघाच्या ग्रंथालय कक्षासाठी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल ,अशी माहिती माजी आमदार संजय रायमुलकर यांनी दिली.
मेहकर वकील संघाच्या कक्षाला आज माजी आमदार संजय रायमुलकर यांनी भेट दिली व वकील संघाच्या अडीअडचणींबाबत बाबत चर्चा केली. मेहकर बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रंथालय कक्षाची स्थापना व्हावी ,अशी अपेक्षा व्यक्त केली. ज्येष्ठ वकील विनय सावजी यावेळी बोलताना म्हणाले की ,मेहकर येथे जिल्हा व सत्र न्यायालयाची स्थापना व्हावी यासाठी आम्ही जेव्हा प्रयत्न करत होतो त्या काळात तत्कालीन आमदार संजय रायमुलकर यांनी मोलाची मदत केली. वकील संघाला सदैव त्यांनी माणुसकीच्या भावनेतून मदतीचा हात दिला याबद्दल ऍड सावजी यांनी रायमुलकर यांचे आभार मानले.
ॲड. गजानन ठाकरे यांनी आपल्या भाषणात
संजय रायमुलकर यांच्यासंबंधीचे अनुभव कथन केले. त्यांच्या कार्यकाळात मेहकर, लोणार तालुक्यात साडेचार हजार कोटींची विकास कामे झाली, हा एक अभूतपूर्व इतिहास झाला आहे ,असेही ते म्हणाले. यावेळी बोलताना ऍड. सदार म्हणाले की, डोणगाव येथे गोरगरीब भाजीपाला विक्रेत्यांची नऊ दुकाने जळून खाक झाली. घटनेची माहिती कळतच संजय रायमुलकर घटनास्थळी आले व त्यांनी व्यावसायिकांची जातपात न पाहता त्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची रोख मदत केली .यावरून त्यांच्या मनात असलेल्या मानवतेच्या भावनेची प्रचिती येते. यावेळी मेहकर वकील संघातर्फे संजय रायमुलकर यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
वकील संघाचे अध्यक्ष ॲड .निखिल मिटकरी यांनीही आपले विचार व्यक्त केले. ऍड .जगन्नाथ निकस, ॲड .निरंजन सांगळे, ॲड .विनोद नरवाडे पाटील, उपाध्यक्ष ॲड .संदीप वाघमारे ,कोषाध्यक्ष ॲड.दिलीप वानखेडे यांच्यासह सर्व वकील मंडळी यावेळी उपस्थित होती. माजी आमदार संजय रायमुलकर यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की ,वकील संघाच्या ग्रंथालय कक्षाच्या बांधकामासाठी ५० लाख रुपयांच्या निधीची व्यवस्था आठवडाभरात करून देण्यात येईल. वकील संघाने सर्व कागदपत्रांची पूर्ती करावी. संपूर्ण मतदारसंघ हा एक परिवार आहे, असे मी मानतो आणि त्यातील प्रत्येक जातीधर्माच्या घटकांसाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्य करण्याचा यापूर्वीही ध्यास घेतला .आणि यापुढेही त्यांच्या हितासाठी मी कार्य करत राहील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. राहुल तुपे यांनी केले तर ॲड .संदीप वाघमारे यांनी आभार मानले.

Previous article
Next article

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!