गाव तेथे युवासेनेची शाखा स्थापन करा – ऋषी भाऊ जाधव युवकांनी युवा सेने जास्तीत जास्त सहभाग घ्यावा – नीरज रायमुलकर मेहकर येथे युवा सेनेच्या शाखेची धुमधडाक्यात स्थापना ऋषी भाऊ जाधव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून युवकांचा युवासेनेकडे वाढला कल

 

मेहकर (उध्दव फंगाळ)

केवळ निवडणुकीवर डोळा ठेवून राजकारण न करता युवकांच्या व लोकांच्या सुखदुःखात नेहमी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून त्यांच्या समस्या अडीअडचणी सोडविण्यासाठी बुलढाणा जिल्हा युवा सेना प्रमुख ऋषी भाऊ जाधव नेहमी अग्रेसर असतात याच पार्श्वभूमीवर युवकांनी सुद्धा युवा सेनेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन गाव तेथे युवा सेना स्थापन करण्याचा उपक्रम राबवावा युवासेना व शिवसेना नेहमी शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या व युवकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे असे बुलढाणा जिल्हा युवासेना प्रमुख ऋषी भाऊ जाधव यांनी सांगितले मेहकर येथे पैनगंगा नगर या ठिकाणी युवा सेनेची धुमधडाक्यात शाखा स्थापन करण्यात आली यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख ऋषी भाऊ जाधव, नीरज रायमुलकर, भूषण घोडे ,नंदू बंगाळे, हर्षल गायकवाड, गोलू शेळके, मंगेश गायकवाड ,शुभम कदम यांच्यासह युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ऋषी भाऊ जाधव व नीरज रायमुलकर यांचे युवकांनी मोठ्या धूमधडाकेबाज स्वागत केले यावेळी ऋषी भाऊ जाधव पुढे म्हणाले की आदरणीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव सन्माननीय माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या माध्यमातून मेहकर मतदार संघात व बुलढाणा जिल्ह्यात शेतकरी गोरगरीब जनता महिलावर्ग लाडकी बहीण यांच्या समस्या अडीअडचणी मार्गी लावण्यासाठी दोन्ही नेतृत्व रात्रंदिवस काम करत आहेत महाराष्ट्रात व केंद्रामध्ये महायुतीची सत्ता आहे सत्तेच्या माध्यमातून आपण सर्वांगीण विकास साधत आहोत त्यामुळे आपला व आपल्या परिसराचा आपल्या समाजाचा गावचा तालुक्याचा जिल्ह्याचा विकास करून घेण्यासाठी युवा वर्गांनी मोठ्या संख्येने युवा सेनेत सहभागी व्हावे युवा सेनेत सहभागी होत असताना गोरगरिबांच्या हितासाठी नेहमी पुढाकार घ्या शासनाच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीमागे आहोत त्यामुळे यापुढे गाव तेथे शाखा स्थापन करून युवा सेनेचे जाळे प्रत्येक गावामध्ये जास्तीत जास्त पोहोचविण्याचा प्रयत्न करावा असेही ऋषी भाऊ जाधव यांनी सांगितले यावेळी निरज रायमलकर म्हणाले की महायुतीला सत्तेमध्ये आणण्यासाठी व शिवसेनेचे हात मजबूत करण्यासाठी युवकांचा मोठा सहभाग आहे युवा वर्गांची ताकद शिंदे शिवसेना पक्षाच्या पाठीमागे नेहमीच राहिलेली आहे व आत्ता सुद्धा आहे युवकांचे एक मोठे संघटन मेहकर मतदार संघात व बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपल्याला तयार करायचे आहे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ऋषी भाऊ जाधव यांच्या माध्यमातून युवा सेना प्रत्येक गावापर्यंत पोहोचवा काही अडीअडचणी समस्या असेल तर आमच्यापर्यंत कळवा आम्ही त्या समस्या व अडचणी केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतापराव जाधव साहेब सन्माननीय माजी आमदार संजय रायमुलकर साहेब जिल्हाप्रमुख ऋषी भाऊ जाधव यांच्या माध्यमातून नेहमी सोडविण्याचा प्रयत्न करू असेही निरज रायमुलकर यांनी सांगितले पैनगंगा नगर मध्ये युवा सेनेच्या शाखेची स्थापना धुमधडाक्यात करण्यात आली युवकांमध्ये आनंदाचे वातावरण होते युवा वर्ग मोठ्या प्रमाणात युवासेनेकडे आकर्षित होत आहे सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन युवकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कामे करावी असेही नीरज रायमुलकर यांनी सांगितले

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!