मेहकर (उध्दव फंगाळ)
माजी आमदार सन्माननीय संजय रायमुलकर साहेब यांनी 29 एप्रिल रोजी मुंबई येथे मंत्रालयामध्ये जाऊन महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री नामदार प्रकाश आंबिटकर साहेब व राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय नामदार जयकुमार गोरे साहेब यांची भेट घेतली या भेटीदरम्यान मेहकर मतदार संघातील विविध विकासात्मक व आरोग्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली संजय रायमुलकर साहेब यांचा पराभव झाला असताना हा पराभव त्यांनी कुठेही मनावर न घेता मायबाप जनतेने दिलेला कल हा मान्य करून पुन्हा आपल्या कामाला निवडणुका झाल्यानंतरही कायमस्वरूपी सुरुवात सुरूच ठेवली आहे मी माझ्या मेहकर मतदारसंघातील मायबाप जनतेला कधीच वाऱ्यावर सोडणार नाही आमदार असलो काय नसलो काय काही फरक पडत नाही विकास निधी आणत असताना सत्ता आवश्यक असते विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधीला पाहिजे तेवढा विकास निधी मिळत नाही सत्ताही महत्त्वाची व महाराष्ट्रात महायुतीची सत्ता असल्यामुळे संजय रायमुलकर साहेब यांची सर्व कामे वेळेवर होत आहेत संजय रायमुलकर साहेब यांचे सर्व महायुतीतील आमदार खासदार मंत्री यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत त्यामुळे विकास कामे आणत असताना किंवा विकासनिधी आणत असताना रायमुलकर साहेब यांना कुठेही अडचण येत नाही याला म्हणतात धडाकेबाज माणूस बोलून नाहीतर करून दाखवतो
सहा ते सात महिन्यापासून मेहकर मतदार संघात नवीन काम किंवा नवीन विकास निधी आलेले चित्र मेहकर मतदार संघातील जनतेला दिसून येत नाही मात्र रायमुलकर साहेब हे नेहमी महिन्यातून दोन ते तीन वेळा मंत्रालयात चकरा मारतात आपल्या मेहकर मतदारसंघात काय कमतरता आहे कुठे निधी आवश्यक आहे याची काळजीने शहानिशा करतात व संबंधित आमदार किंवा मंत्री यांच्याशी संपर्क साधून त्यांच्यासमोर आपल्या मेहकर मतदार संघाची परिस्थिती अगदी सुव्यवस्थितपणे मांडून जनहिताच्या दृष्टीने विकास निधी खेचून आणण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात 29 एप्रिल रोजी आरोग्य मंत्री नामदार श्री प्रकाश आंबिटकर साहेब यांची भेट घेऊन मेहकर मतदारसंघातील आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली तर भविष्यामध्ये मेहकर मतदार संघात गोरगरीब लोकांना आरोग्याची सुविधा वेळेवर मिळाली पाहिजेत यासाठी रायमुलकर साहेब यांनी आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे व ही चर्चा यशस्वी झाल्याचे सुद्धा समजते त्याचबरोबर ग्राम विकास मंत्री माननीय नामदार जयकुमार गोरे साहेब यांची सुद्धा रायमुलकर साहेब यांनी भेट घेतली आपल्या मतदारसंघातील महत्त्वाच्या विकासावर चर्चा केली ग्रामीण भागातील विकास झाला पाहिजेत एकही गाव विकासापासून वंचित राहिले नाही पाहिजेत यासाठी ग्राम विकास मंत्री सोबत यशस्वी चर्चा करण्यात आली निवडणुका येतील निवडणूका जातील हार जीत ही सुरूच राहणार आहे मात्र जी जनता आपल्या पाठीमागे आई-वडिलांसारखे उभी राहते सुखदुःखात आपल्याला साथ देते त्या जनतेला मी कधीही वाऱ्यावर सोडणार नाही कोणाचाही राग मनामध्ये बिलकुलही न ठेवता अगदी मागील पंधरा वर्षापासून जसे रायमुलकर साहेब काम करत होते बिलकुल त्याच नुसार सध्याही रायमुलकर साहेब यांचे काम सुरू आहे हे आपल्याला दिसून येत आहे
