मेहकर (उध्दव फंगाळ)
रविवार, दि ११ मे २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना पक्षातर्फे, भारतीय सशस्त्र दलाला मानवंदना अर्पण करण्यासाठी “तिरंगा मोटार सायकल रॅली” चे आयोजन करण्याचे नियोजले आहे- सदर मोटार सायकल रॅली ०९ वाजता शासकीय विश्राम गृह मेहकर येथून निघेल.
सदर मोटार सायकल रॅली मध्ये मा.ना.श्री.प्रतापरावजी जाधव साहेब, केंद्रीय मंत्री, (आयुष) आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, मा.आ.संजयजी रायमुलकर साहेब हे उपस्थित राहणार आहेत.
तरी शिवसेना पक्षाचे पदाधिकारी महिला आघाडी, युवासेना, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख तसेच सर्व पदाधिकार्यांनी मोठ्या संखेने उपस्थित रहावे.
मोटार सायकल रॅलीची वेळ :- ०९ वाजता
मोटार सायकल रॅली ठिकाण :- शासकीय विश्राम गृह मेहकर
