मेहकर (उध्दव फंगाळ)
शिंदे युवा सेनेचे बुलढाणा जिल्हा प्रमुख ऋषी जाधव यांच्या कुशल व रोखठोक व्यक्तिमत्त्वामुळे बुलढाणा जिल्ह्यातील युवा वर्गांचा कल दिवसेंदिवस युवासेनेकडे वाढत असल्याचे दिसून येत आहे मेहकर तालुक्यासह आता देऊळगाव राजा तालुक्यातही अनेक गावांमध्ये युवा सेनेच्या शाखा स्थापन झाल्या आहेत युवकांचा युवा सेनेकडे कल वाढताना दिसून येत आहे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ऋषी जाधव यांनी बुलढाणा जिल्ह्यात गाव तेथे शाखा व घर तिथे युवा सैनिक हा उपक्रम मोठ्या प्रमाणात सुरू केला असून प्रत्येक गावामध्ये युवा सेनेची शाखा स्थापन झालीच पाहिजेत व प्रत्येक घराघरात शिंदे शिवसेना पक्षाचे आचार विचार पोहोचले पाहिजेत यासाठी ऋषी जाधव रात्रंदिवस मेहनत घेत आहेत युवकांना संघटित करून वेळोवेळी बैठक, मिटिंग घेऊन युवकांना मार्गदर्शन करत आहेत राजकारण हे युवकांसाठी एक सुवर्णसंधी असून आपल्या गावचा तालुक्याचा व जिल्ह्याचा विकास करण्यासाठी युवकांनी जास्तीत जास्त युवा सेनेमध्ये सामील होऊन विकासात्मक दृष्टिकोन समोर ठेवून अहोरात्र काम केले पाहिजेत यासाठी ऋषी जाधव आपल्या मावळ्यांना घेऊन प्रत्येक गावांना भेटीगाठी देत आहेत गावकऱ्यांच्या व युवकांच्या भेटी घेऊन सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या जास्तीत जास्त योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी युवा सेनेच्या माध्यमातून ऋषी जाधव युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत दिवसभर शक्य होतील तेवढ्या गावांना भेट देऊन ऋषी जाधव रात्री उशिरापर्यंत युवकांच्या भेटीगाठी घेत आहेत व्यवस्थित व भविष्यामध्ये राजकारणात युवकांचा जास्तीत जास्त सहभाग असला पाहिजेत हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी युवा सेना व शिवसेना बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये, घराघरांमध्ये पोहोचली पाहिजेत यासाठी ऋषी जाधव सतत मेहनत घेत आहेत ऋषी जाधव यांच्या सोबतीला आज रोजी प्रत्येक गावातील युवा वर्ग मोठ्या प्रमाणात जोडल्या जात आहे ही शिंदे पक्षासाठी भविष्याच्या दृष्टीने अतिशय चांगली बाब आहे ऋषी जाधव युवकांबरोबरच शेतकरी सर्वसामान्य नागरिक यांच्या समस्या सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात पंचायत समिती महसूल विभाग पोलीस स्टेशन व इतर विभागाची कोणतीही कामे असली तर ऋषी जाधव आलेल्या माणसाची कामे ताबडतोब करून देत आहेत जात, धर्म, पंथ, राजकीय पक्ष न पाहता आलेल्या माणसाचं समाधान झालं पाहिजेत एकेक माणूस शिंदे पक्षाकडे जोडल्या गेला पाहिजे यासाठी ऋषी जाधव मेहनत घेताना दिसून येत आहेत याच पार्श्वभूमीवर देऊळगाव राजा तालुक्यात सावरखेड नागरे, पाडळी शिंदे, नागणगाव, सुरा, सरंबा या गावांमध्ये युवा सेनेचे जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास खेडेकर यांच्या माध्यमातून युवा सेनेच्या शाखा स्थापन करण्यात आले आहेत तर याच बरोबर बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात व प्रत्येक गावामध्ये युवा शिवसेनेची शाखा स्थापन करून युवा सेनेचे कार्य शिवसेनेचे काम करण्याची पद्धत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घराघरात युवासेना व शिवसेना पोहोचली पाहिजेत यासाठी ऋषी जाधव मेहनत घेत आहेत येणाऱ्या काळात बुलढाणा जिल्ह्यात युवा सेनेची ताकद वाढल्याशिवाय राहणार नाही एवढे मात्र नक्की
