वाढदिवस हे निमित्त जिल्ह्यात युवकांचा उत्साह मात्र वाढला ! बुलढाणा जिल्ह्यात ऋषी जाधव ठरत आहेत युवकांचे खंबीर नेतृत्व भविष्याच्या दृष्टीने शिंदे युवा सेनेसाठी युवकांचे नेतृत्व येत आहे उदयास बुलढाणा जिल्ह्यासह मेहकर मतदार संघातही भरगच्च कार्यक्रम

 

मेहकर (उध्दव फंगाळ) शिंदे युवा सेनेचे महाराष्ट्र राज्य सचिव व बुलढाणा जिल्हाप्रमुख , केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांचे सुपुत्र ऋषी जाधव यांचा 4 जून रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला
वाढदिवसाच्या निमित्ताने ऋषी जाधव यांचा मेहकर मतदार संघासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात ठिकठिकाणी सत्कार करण्यात आला विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आले मात्र काहीही असले तरी वाढदिवस हे एक निमित्त होते मात्र ऋषी जाधव यांच्या पाठीमागे वाढत असलेला युवावर्गांचा उत्साह मात्र पाहायला मिळाला अलीकडच्या काळापासून ऋषी जाधव यांनी शिंदे युवा सेनेच्या माध्यमातून संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात आपली पकड निर्माण केली आहे युवा सेनेचे एक जाळ बुलढाणा जिल्ह्यात पसरवण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न सुरू केले आहेत याचाच एक भाग म्हणून भविष्याच्या दृष्टीने शिंदे युवा सेनेसाठी युवकांचे नेतृत्व उदयास येत असल्याचे चित्र वाढदिवसाच्या निमित्ताने पाहायला मिळाले बुलढाणा जिल्ह्यासह मेहकर मतदार संघातही ऋषी जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यक्रमासह इतरही समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात आले होते वाढदिवस कोणाचाही असला की सत्कार समारंभ होतच असतात मात्र ऋषी जाधव यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सत्कार तर झालेच आहेत मात्र इतरही सामाजिक कार्यक्रम सुद्धा राबविण्यात आले आहेत युवकांमध्ये एक आनंद एक उत्साह ऋषी जाधव यांच्या संदर्भात दिसून आला आहे मेहकर मतदार संघात तर ऋषी जाधव यांचा युवकांचा मोठा गोतावळा आहे मात्र त्याचबरोबर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातही ऋषी जाधव हे युवकांच्या मनावर राज्य करीत असल्याचे दिसून येत आहे हे मात्र सहजासहजी होत नाही कारण लोक जमवन किंवा युवक आपल्या पाठीमागे आले पाहिजेत ही साधी गोष्ट नाही रात्रंदिवस त्यांच्यासाठी काम करावे लागते रात्र असो दिवस असो सुखदुःख बाजूला सारून वेळप्रसंगी लोकांच्या व युवकांच्या सुखा – दुखात खांद्याला खांदा लावून उभे राहावे लागते त्याच वेळेस जनता जनार्दन पाठीमागे राहत असते याचाच प्रत्येक अलीकडच्या काळात ऋषी जाधव यांच्या संदर्भात दिसून येत आहे ऋषी जाधव यांना राजकीय वारसा जरी असला तरी त्यांचा वैयक्तिक स्वभाव काम करण्याची त्यांची पद्धत , केवळ आश्वासन न देता ऑन दी स्पॉट काम करून देणे रोखठोक स्वभाव व त्याचबरोबर नेहमी हसत चेहरा व कोणताही व्यक्ती किंवा युवक कोणत्याही जाती धर्माचा असो तो जर आपल्याकडे काहीतरी काम घेऊन आला असेल तर त्याचे काम शंभर टक्के करून देणे किंवा त्याचे समाधान झाले पाहिजेत यासाठी ऋषी जाधव अलीकडच्या काळापासून अग्रेसर दिसून येत आहेत अगदी लहान मुलांपासून तर वयोवृद्ध पर्यंत ऋषी जाधव यांच्या संदर्भात आत्मीयता वाढताना दिसत आहे सध्या शिंदे शिवसेना पक्षाची पकड बुलढाणा जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रमाणात आहे मात्र ही पकड अधिक घट्ट करण्यासाठी ऋषी जाधव युवा सेनेच्या माध्यमातून मेहनत घेऊन गाव तिथे शाखा घराघरात शिंदे साहेबांचे विचार पोहोचले पाहिजेत स्वर्गीय आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजेत यासाठी ऋषी जाधव गेल्या अनेक दिवसापासून मेहनत घेत आहे व त्या मेहनतीच फळ दिवसेंदिवस दिसून येत आहे याचाच प्रत्येय वेळोवेळी युवकांना आलेला आहे एवढ्या कमी वयामध्ये संघटनेमध्ये काम करणे राजकारणामध्ये काम करणे व काम करत असताना युवकांच्या व लोकांच्या मनामध्ये एक विश्वासाचे घर निर्माण करणे ही साधी गोष्ट नाही व ती प्रत्येकाला जमतही नाही मात्र ऋषी जाधव याला अपवाद ठरले असून एक आपला हक्काचा माणूस असल्याचे ऋषी जाधव यांच्या संदर्भात बोलल्या जात आहे ऋषी जाधव यांचा स्वभाव जेवढा रोखठोक आहे तेवढी त्यांची काम करण्याची पद्धत अतिशय चांगली आहे आलेला माणूस हा शंभर टक्के त्यांच्याकडून काम करून घेत असतो हे अनेकांना दिसून आलेले आहे आलेला माणूस हा गरीब आहे की श्रीमंत आहे कोणत्या जातीचा आहे किंवा कोणत्या पक्षात काम करतो हे न पाहता अगोदर त्याचे काम करून देणे हे ऋषी जाधव आपले कर्तव्य समजतात तर त्यानंतर आपल्या युवा सेनेची किंवा शिवसेनेची ताकद बुलढाणा जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात वाढली पाहिजेत यासाठी ऋषी जाधव नेहमीच मेहनत घेत असल्याचे दिसून येत आहे अलीकडच्या काळात शिंदे पक्षाकडे विशेष करून युवा सेनेकडे युवकांचा कल दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे सर्व जाती धर्माचे युवक ऋषी जाधव यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेमध्ये काम करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे भविष्याच्या दृष्टीने बुलढाणा जिल्ह्यासाठी एक युवा व विश्वासाच नेतृत्व ऋषी जाधव यांच्या रूपाने उदयास येत असल्याचे दिसून येत आहे एवढे मात्र खरे

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!