न. प.निवडणुकीत महाविकास आघाडी झाली तर,,,,,,? अनेक कार्यकर्त्यावर होऊ शकतो अन्याय, बंडखोरीचीही शक्यता न.प.निवडणुकीवर डोळा ठेवून अनेक वर्षापासून करत आहे काही कार्यकर्ते काम नगराध्यक्ष पदावर अनेकांचा डोळा, मात्र वेळेवर होऊ शकते नाराजी

 

मेहकर (उध्दव फंगाळ) महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच होऊ घातल्या आहेत त्या दृष्टीने हालचाली सुद्धा सुरू झाल्या आहेत याच पार्श्वभूमीवर मेहकर नगरपालिकेची निवडणूक सुद्धा होणार आहे मात्र या निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेस, शरदचंद्र पवार साहेब राष्ट्रवादी व उबाठा यांची जर महाविकास आघाडी झाली तर अनेक कार्यकर्त्यावर अन्याय होण्याची शक्यता आहे तर वेळप्रसंगी मोठ्या प्रमाणात बंडखोरी सुद्धा होऊ शकते कारण नगरपरिषदेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून अनेक कार्यकर्ते कित्येक वर्षापासून काम करत आहेत तर केवळ नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा तीनही पक्षातील इच्छुक उमेदवार इच्छुक आहेत मात्र जर महाविकास आघाडी झाली तर नगराध्यक्ष नेमका कोण होणार हे सध्या जरी नक्की नसले तरी वेळेवर मात्र अनेकांची नाराजी होणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे मात्र वेळेवर काय राजकीय घडामोडी होतात हे सध्या सांगणे तरी कठीण आहे
मेहकर नगरपालिका निवडणुकीसंदर्भात जे इच्छुक उमेदवार आहेत ते गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहेत आपल्याला नगरपालिकेचे नगरसेवकाचे तिकीट मिळाले पाहिजे किंवा नगराध्यक्ष आपणच झालो पाहिजेत नगराध्यक्ष पदासाठी आपलेच नाव समोर आले पाहिजेत यासाठी महाविकास आघाडीत अनेक जण इच्छुक आहेत नगरपरिषद निवडणुकीत आपल्यालाच उमेदवारी मिळाली पाहिजेत यासाठी अनेक जण अनेक वर्षापासून पक्षाचे निस्वार्थपणे काम करत आहेत निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे अनेकांचा हिरमोड झालेला होता मात्र अखेर निवडणुकीला मुहूर्त मिळाला असून लवकरच मेहकर नगरपालिकेच्या निवडणुका होणार असल्याने अनेक इच्छुक कामाला लागल्याचे दिसून येत आहे मात्र मेहकर नगरपालिकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढणार का? वेगवेगळी लढणार हे आज रोजी तरी निश्चित झालेले दिसत नाही मात्र जर महाविकास आघाडीने एकत्रित निवडणूक लढविली तर मात्र अनेकांची नाराजी होऊन मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता दिसून येत आहे तर नगराध्यक्ष पदावर अनेकांचा डोळा आहे व या लोकांना राजकारणामध्ये फक्त नगरपालिकेमध्येच संधी असल्याचे चित्र सुद्धा आहे त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीकडे ग्रामीण भागात या लोकांचे काही देणे घेणे नसल्याने केवळ नगरपालिकेपुरतेच राजकारण काही लोक करत आहेत त्यामुळे आपल्याला तिकीट मिळाले पाहिजेत आपण नगरसेवक अथवा काहीजण नगराध्यक्ष झाले पाहिजेत या आशेवर पक्षाचे काम अनेक वर्षापासून करत आहेत मात्र तीन-तीन पक्ष एकत्रित निवडणुका लढवत असल्याने अनेक वेळा निष्ठावान व मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्यावर अन्याय होत आहे याचा परिणाम निवडणुकीवर सुद्धा दिसून येतो होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे मात्र जर महाविकास आघाडी झाली तर जागेचे विभाजन नक्की होणार आहे त्यामुळे अनेकांचे तिकीट कापल्या जाणार ही गोष्ट नक्की आहे त्यामुळे येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी नेमकी कोणती रणनीती आखतात वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात स्थानिक पातळीवरील नेते काय निर्णय घेतात किंवा इच्छुक उमेदवार काय निर्णय घेतात या संदर्भात दबक्या आवाजात उलट सुलट चर्चा गेल्या काही दिवसापासून ऐकायला मिळत आहे महाविकास आघाडीचा मेहकर मतदारसंघात आमदार आहे मात्र हे आमदार उबाठाचे असल्यामुळे जर महाविकास आघाडी झाली तर उबाठाला जास्त जागा जाऊ शकतात व नगराध्यक्ष सुद्धा उबाठाचाच ते लोक मागू शकतात पण शहरांमध्ये काँग्रेस पक्षाची ताकद महाविकास आघाडीतील इतर पक्षापेक्षा जास्त दिसून येत आहे त्यामुळे काँग्रेसवर विधानसभेत जसा अन्याय झाला तसाच अन्याय नगरपालिकेत होणार का? या संदर्भातही उलट सुलट चर्चा ऐकायला मिळत आहे मात्र काहीही असले तरी जर नगरपरिषद मध्ये महाविकास आघाडी झाली तर अनेकांची नाराजी होऊन गेल्या अनेक वर्षापासून नगरपरिषद निवडणुकीसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर नक्कीच अन्याय होणार व बंडखोरीला उधान येणार असे म्हटल्यास वावगे ठरू नये तूर्त एवढेच

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!