मेहकर (उध्दव फंगाळ)दिवसेंदिवस काळ बदलत आहे वेगवेगळ्या क्षेत्रात परिवर्तन घडत आहे नरेंद्र मोदी साहेब व महायुती सरकारच्या माध्यमातून समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी लाभदायक अशा योजना राबविण्यात येत आहेत याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या वतीने सामूहिक विवाह सोहळे सुद्धा आयोजित करण्यात येत आहे गोरगरीब कुटुंबातील वधू-वरांना आर्थिक मदत सुद्धा या सोहळ्याच्या माध्यमातून करण्यात येत आहे शेतकरी व सर्व सामान्य नागरिकांनी भविष्यात होणाऱ्या सामूहिक विवाह सोहळ्याकडे वळावे व घरगुती कुटुंबात लग्न सोहळ्यामध्ये होणारा अनाठही खर्च टाळावा सामूहिक विवाह सोहळा ही काळाची गरज झाली असून शेतकरी गोरगरीब कुटुंबातील व सर्व जाती धर्मातील लोकांनी सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये आपल्या मुला मुलींचे विवाह करावेत असे आवाहन बुलढाणा जिल्हा युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ऋषी जाधव यांनी केले
मेहकर तालुक्यातील
खंडाळा देवी येथे पूजा बहुउद्देशीय मागासवर्गीय संस्था, मेहकरच्या वतीने सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन ९ जून रोजी करण्यात आले होते करण्यात आले. या सोहळ्यात विविध गावांमधून आलेल्या ४५ वधू-वर जोडप्यांचे विवाह धार्मिक विधीनुसार संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये संस्थेच्या अध्यक्षा सुनीता मोरे यांचा मोलाचा सहभाग होता. या वेळी विविध मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली. युवा सेनेचे अध्यक्ष ऋषीभाऊ जाधव, मेहकर तहसीलचे नायब तहसीलदार देशमुख साहेब, खंडाळा देवीचे सरपंच रतन पाटील मानघाले, पत्रकार संदीप ढोरे, माजी सरपंच नंदाबाई पडघान, पत्रकार उद्धव फंगाळ यांच्यासह अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या.
या सोहळ्यात हिंदू व बौद्ध धर्मियांच्या परंपरेनुसार विवाह विधी पार पाडण्यात आले. खंडाळा देवी ग्रामस्थ आणि वधू-वरांसोबत आलेल्या नातेवाईकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. उपस्थित सर्व मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.
विवाहानंतर वधू-वर आणि उपस्थितांना उपहार म्हणून नाश्ता देण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम खंडाळा देवी येथील उच्च प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात पार पडला.
