केंद्रीय मंत्री श्री प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उबाठा महिला आघाडीच्या अनेक महिला शिंदे शिवसेना पक्षात दाखल निवडणुकीच्या तोंडावर चिखली शहरात व तालुक्यात उबाठाला पडले खिंडार शिंदे शिवसेना पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मायाताई मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली केला प्रवेश स्थानिक स्वराज्य संस्थेवर शिंदे शिवसेना पक्षाचा झेंडा फडकविण्याच्या केंद्रीय मंत्री श्री प्रतापराव जाधव यांनी केल्या सूचना

 

मेहकर (उध्दव फंगाळ )

केंद्रीय मंत्री श्री प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व इतर महिलांनी आज 15 जून रोजी शिंदे शिवसेना पक्षांमध्ये जाहीर प्रवेश घेतला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या असताना चिखली शहरांमध्ये व तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला मोठे खिंडार पडल्याचे दिसून येत आहे शिंदे शिवसेना पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मायाताई मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्षप्रवेश करण्यात आला आहे येणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये शिंदे शिवसेना पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी केंद्रीय मंत्री श्री प्रतापराव जाधव यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सूचना केल्या आहे तर कोणत्याही परिस्थितीमध्ये बुलढाणा जिल्ह्यात जेवढ्या नगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समिती असेल त्यावर शिंदे शिवसेना पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याच्या सूचना यावेळी केंद्रीय मंत्री श्री प्रतापराव जाधव यांनी केल्या आहे शिंदे शिवसेना पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मायाताई मस्के यांच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यात गेल्या अनेक महिन्यापासून विविध राजकीय पक्षातील महिला शिंदे शिवसेना पक्षांमध्ये दाखल होत आहेत शिंदे शिवसेना पक्षाची ताकद दिवसेंदिवस बुलढाणा जिल्ह्यात वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे येणाऱ्या विविध निवडणुका संदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला चिखली शहरात व तालुक्यात मोठे खिंडार पडले असून अधून मधून शिंदे शिवसेना पक्षांमध्ये अनेकांचे प्रवेश होत आहेत केंद्रीय मंत्री श्री प्रतापराव जाधव यांचे कुशल ,रोखठोक व सर्वहित जोपासून असलेले नेतृत्व मान्य करून इतर पक्षातील अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी शिवसेना पक्षांमध्ये दाखल होत असल्याचे चित्र अनेक दिवसापासून पाहायला मिळत आहे तर युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ऋषी जाधव यांच्या माध्यमातूनही बुलढाणा जिल्ह्यामध्ये युवा सेनेचे कार्य सुद्धा वाढत आहे चिखली शहर व तालुक्यातील उबाठाच्या अनेकांनी मेहकर येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालय मध्ये केंद्रीय मंत्री श्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते व महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मायाताई मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिंदे शिवसेना पक्षात प्रवेश घेतला आहे यावेळी
महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख कल्पना गोविंद बोधेकर ,द्वारका संजय भोसले, उपशहर प्रमुख लता कैलास शिंदे, उमा महेश बोदेकर, रेखा मिलिंद लव्हाळे, वैशाली संजय घोरपडे, शिला एकनाथ खरात, मंदा मिलिंद डोंगरदिवे ,स्वाती रामा खिल्लारे, ज्योती रवी जाधव यांच्यासह
योगेश जाधव तुकाराम सास्ते गणेश अवचार अनिकेत श्रीमंत आदींनी पक्ष प्रवेश घेतला यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख सुरेश तात्या वाळूकर ,भास्करराव राऊत, अनमोल ढोरे पाटील ,कैलास भाऊ आलेकर उपतालुकाप्रमुख अनिल भाऊ जाधव गजाननराव मस्के गोविंद बोधेकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!