मला, शेतकरी नवरा नको गं बाई… हुंडा नको, मामा पोरगी द्या मला पित्यास मुलाच्या लग्नाची चिंता

 

रमेश खराडे – सेलू 

बदलत्या काळानुसार सामाजिक परिस्थितीत बदल होत गेले.पालकांनी एक मुलगी, दोन मुलांवर समाधान मानले. त्यासाठी तपासणी करून मुलींच्या भ्रूणहत्याही केल्या आहेत. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून मुलींची संख्या घटत गेली. वधू पित्याकडून लाखो रुपये हुंड्याची अपेक्षा करणारे वर पिता आज बिना हुंड्याच्या मुली करायला तयार आहेत. परंतु, आता मुली मिळत नसल्याने वर पित्याचीच फजिती होताना दिसते. त्यामुळे मामा सह नातेवाईकांकडे मुलींचा शोध घेतला जात आहे. आता हुंडा नको फक्त पोरगी द्या मला,असे म्हणण्याची वेळ मुलांवर आली आहे.

तुळशी विवाह नंतर लग्नसराईला सुरुवात होत. आधी उपवर वधू पित्यांना मुलीच्या चिंता असायची. आता वर पित्यानां मुलांच्या लग्नाची चिंता आहे. आता मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या घटली आहे. शिवाय मुली शिक्षणात आघाडीवर आहेत.
त्यामुळे नोकरी आणि शहरात वास्तव्य करणाऱ्या मुलांना पसंती दिली जात आहे. तर बहुतांश मुली शेतकरी मुलांना नाकारत असल्याने वधु पित्यांना योग्य वर मिळतो. मुलगा नोकरीवालाच पाहिजे व त्यात तो शहरातील असावा तरच सोयरीक होते, अशी अपेक्षा वधू पित्याची आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मुली मिळत नसल्याने मुलांना 35 होऊन मुंजे फिरावे लागत आहे, अनेक जण दलाला मार्फत सोयरिकी करतात. त्यानंतर फसवणूक होते, असे समाज सेवक सदाशिव बन्सीराम फाटे यांनी सांगितले.

 

चौकट

दुष्काळामुळे शेती व्यवसाय अडचणीत. मुले झाली व्यसनी

अनेक वर्षापासून दुष्काळ पडत असल्याने शेती व्यवसाय संकटात सापडत आहे. त्यामुळे गावा -गावात उपवर झालेल्या मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. लग्न जुळत नसल्याने अनेक मुले व्यसनाधिक होत आहेत. त्यामुळे लग्नासाठी मुली मिळत नाहीत. त्यात मोठ्या प्रमाणात अपेक्षाही वाढल्या आहेत.

—बबन नानाभाऊ मोरे. सुजान नागरिक,सेलू.

चौकट

पूर्वी मुला मुलींचे लग्न जुळवताना त्यांच्या पसंतीचा विचार होत नव्हता. पण, मोठ्या प्रमाणात हुंडा द्यावा लागत असे. ती परिस्थिती आता राहिली नाही. आता मुलींचीच पसंती अधिक महत्त्वाची ठरत आहे.

– रतनराव गनंपतराव जाधव. ज्येष्ठ नागरिक माळसापुर

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!