डोणगाव अर्बनची जाणीवपूर्वक बदनामी करणाऱ्यास सणसणीत चपराक समाज माध्यमांवर बदनामी करणे भोवले कराटे मास्टर राजेश जाधव याच्यावर गुन्हा दाखल गजानन बोरकर

डोणगाव:
अगदी कमी कालावधीत यशाचे उच्चांक गाठलेल्या डोणगाव अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या जाणीवपूर्वक बदनामी करणाऱ्यांना पोलीस प्रशासनाकडून सणसणीत चपराक. समाज माध्यमांवर अकारण बदनामी करणाऱ्या राजेश माधव जाधव यांच्यावर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करून गुन्हा दाखल केलेला आहे.आपल्या वेगळ्या आणि उत्कृष्ट सेवांमुळे कमी कालावधीमध्ये हजारो ग्राहकांच्या मनावर अधिराज्य करणारी डोणगाव येथील डोणगाव अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ही यशाचे उच्चांक गाठत आहे त्यामुळे समाजातील विघ्न संतोषी लोकांच्या मनामध्ये अकारण जळावु वृत्ती तयार होत आहे.

त्यामुळे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून बदनामी करण्याचे प्रयत्न ते करत असतात परंतु अशा लोकांना वेळीच ठेचले नाही तर त्यांची ही वृत्ती वाढत जाऊन कुठल्याही संस्थेस अडचण निर्माण करू शकते म्हणून डोणगाव अर्बनचे सरव्यवस्थापक शेख समीर शेख समद यांनी डोणगाव पोलीस स्टेशन येथे फिर्याद देऊन बदनामी करणाऱ्या राजेश माधव जाधव यावर कठोर कारवाईची मागणी केली.

सदर घटनेची हकीकत अशी की दिनांक २० /१२/२०२३ रोजी आरोपी राजेश माधव जाधव याने डोणगाव येथील चालवला जाणारा जि, प.पं स व्हाट्सअप ग्रुप मध्ये डोणगाव अर्बनच्या सेवांबद्दल बदनामी करणारा मजकूर टाकला वास्तविकता अशी की राजेश माधव जाधव या इसमाचा डोणगाव अर्बन बँकेची कुठल्याही प्रकारचा संबंध नसुन तसेच त्याचे बँक खाते नसल्याचे आढळून आले.

तो ग्राहक सुध्दा नाही त्या अनुषंगाने डोणगाव पोलीस स्टेशन येथे आरोपी राजेश जाधव यावर भारतीय दंड संहिता१८६० कलम ५०० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.पुढिल तपास ठानेदार अमरनाथ नागरे सहाय्यक ठानेदार सालवे यांच्या मार्गदर्शनामध्ये करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!