चोपडा तापी सुतगिरणी जवळ बसचा भीषण अपघात सुदैवाने जीवीतहानी टळली हेमकांत गायकवाड

चोपडा
चोपडा बस्थानकातुन सकाळी 11 वाजेला नाशिक चोपडा बस क्र.एम एच 14 बीटी 2142 ही निघाली असता धरणगाव रोडवर तापी सूतगिरणी जवळ भीषण अपघात झाला बसचा वेग ऐवढा होता की गेट तोडून मध्ये घुसली हे सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट निदर्शनात येत आहे मात्र यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही मिळालेल्या माहितीनुसार व प्रत्यक्षात पाहणी केली असता चालकाचा हलगर्जीपणा व वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याचे प्रवासी कडुन बोलले जात आहे.

बस मध्ये एकूण 70 ते 80 प्रवासी होते मात्र त्यात कोणालाही दुखापत झालेली नाही याबाबत चोपडा आगाराचे व्यवस्थापक महेद्र पाटील यांना विचारणा केली असता संबंधित बस अपघाताची चौकशी करण्यात येत आहे यात वाहक चालक जर दोषी आढळल्यास यांच्यावर उचित कारवाई करण्यात येईल व चालक यांना तात्पुरते निलंबित करण्यात आलेले आहे

असे देखील आगार व्यवस्थापक पाटील यांना विचारले असता सांगीतले बस अपघाता संदर्भात लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार बसचे ब्रेक फेल झाल्याचे कारण ड्रायव्हर यांनी दाखवले मात्र त्यात लांब पल्याची गाडी असल्यामुळे आगारातूनच गाडी निघताना गाडी चेक करून काढण्यात येते व खात्रीशीरपणे लांब पल्ल्याच्या गाड्या पाठवण्यात येतात

सदर अपघाता स्थळी आगाराचे मेकॅनिकल यांना पाठवले असता त्यात अपघातात बसचे ब्रेक फेल झालेले निदर्शनास आले नाही व त्यात ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने व महाराष्ट्र राज्य महामार्ग पंधरा(१५) वरील रस्त्यावरील खड्ड्यामुळे सदर अपघात झालेला आहे अशी माहिती आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील यांच्याकडून प्राप्त झाली.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!