मेहकर (उध्दव फंगाळ)
दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी काँग्रेस पक्षाच्या 138 व्या वर्धापन दिनानिमित्त अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी द्वारा आयोजित “है तयार हम” हे ब्रीदवाक्य घेऊन देशातील व राज्यातील अनेक ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्याकरिता काँग्रेस पक्षाच्या अनेक मान्यवर नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
या रॅली निमित्त संपूर्ण देशभरातून जवळपास 8 ते 10 लाख लोकांचा समूह मोठ्या संख्येने जमा होइल अशी माहिती आहे.सदर महा रॅलीची जय्यत तयारी नागपूर येथे मोठ्या प्रमाणात सुरू आहे.सदर महा रॅली यशस्वी करण्याची जबाबदारी विदर्भावर जास्त प्रमाणात आहे.
सदर रॅलीस संबोधन करण्याकरिता अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.खा.मल्लिकार्जुन खरगे साहेब, खासदार श्रीमती सोनियाजी गांधी,खासदार श्री. राहुलजी गांधी,खासदार श्रीमती प्रियंकाजी गांधी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा खासदार श्री.मुकुलजी वासनिक साहेब,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. नानाभाऊ पटोले, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री. अशोकरावजी चव्हाण साहेब,राज्याचे विरोधी पक्ष नेते श्री.विजयजी वडेट्टीवार साहेब, मार्गदर्शन करणार असून सदर महा रॅलीकरिता देशातील व राज्यातील अनेक आजी-माजी नेते,मंत्री, आमदार,खासदार उपस्थित राहणार आहे.
सदर महारॅली करिता जिल्ह्यातील व राज्यातील काँग्रेस पक्षाचे समस्त नेते पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच NSUI,महिला काँग्रेस, सेवादल, बूथ कमिटी सदस्य,विविध फ्रंटलचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते तसेच काँग्रेस पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता यांनी दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 1.30 वाजता नागपूर येथे उपस्थित रहावे असे आव्हान प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री.श्याम उमाळकर यांनी केले आहे.