आंदोलन सम्राट गजानन बोरकर यांचा सत्कार

 

मेहकर(आनंद फंगाळ)

यशवंत सेनेचे बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख आंदोलन सम्राट गजानन बोरकर यांनी धनगर समाज बांधवांच्या आरक्षणासंदर्भात गेल्या काही दिवसापासून अनेक आंदोलन केले आहे यामध्ये नऊ दिवस उपोषण तर टावर वर जाऊन जीव घेणे आंदोलन सुद्धा केले आहे समाज जागृतीसाठी ते गेल्या अनेक दिवसापासून धडपड करीत आहेत धनगर समाज जागृत व्हावा धनगर समाजाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा समाजामध्ये एकीकरण व संघटन राहावे

एकमेकाला सहकार्याची भूमिका असावी या माध्यमातून गजानन बोरकर सतत प्रयत्न करीत आहेत तर त्यांना जिल्हा उपाध्यक्ष धनंजय रौंदळे व इतर सहकारी सुद्धा मदत करीत आहे गजानन बोरकर हे वेळोवेळी समाजातील वरिष्ठ नेत्यांची मार्गदर्शन घेत असतात अतिशय कमी वयामध्ये ते धनगर समाजाच्या हितासाठी धडपड करीत आहेत त्यांच्या कामाची धडपड पाहून मागील महिन्यात कोल्हापूर येथे धनगर समाज बांधव व नेत्यांच्या वतीने आंदोलन सम्राट गजानन बोरकर यांचा सत्कार करण्यात आला होता

तर मेहकर मध्ये सुद्धा एक युवक समाजासाठी धडपड करीत असल्याचे पाहून काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस श्याम भाऊ उमाळकर यांनी सुद्धा गजानन बोरकर यांचा सत्कार केला तर मेहकरचे ठाणेदार राजेश शिंगटे यांनी सुद्धा गजानन बोरकर यांचा सत्कार केला आहे यावेळी दैनिक विदर्भ सत्यजितेचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ, शिवसेनेचे नगरसेवक तौफिक कुरेशी, फारुक शेख ,अख्तर कुरेशी यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!