खासदार हेमंत पाटलांना आंतरराष्ट्रीय दूरध्वनी द्वारे धमकी

यवतमाळ/महागाव:-(सदानंद जाधव)
दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी रात्री 10.08 मी. आंतरराष्ट्रीय मोबाईल नंबर वरून हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांना धमकीचा फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

या संदर्भात खासदार हेमंत पाटील यांनी काल भारताच्या राष्ट्रपतींना या गंभीर प्रकाराबद्दल निवेदन सादर केले. अवगत करुन हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांना 447418601750 या आंतरराष्ट्रीय सेल फोन द्वारे धमकी मिळाल्याचे त्यांनी महामहीम राष्ट्रपती यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.

दि. 14 डिसेंबर 2023 रोजी रात्रीच्या वेळेला आंतरराष्ट्रीय फोन द्वारे धमकी मिळाली असून धमकी देणारा पन्नू नामक व्यक्तीने माझ्या वैयक्तिक मोबाईल नंबर वर सदर कॉल करून मला, फोन उचलण्यात आल्यावर पन्नू नमक व्यक्तीने इंग्रजी भाषेत संभाषण करून धमकी देत स्वतःला वाचवीचा येत असेल तर वाचवा.

येत्या 26 जानेवारी 2024 ला हिंदुस्थान मध्ये आम्ही मोठा घातपात घडवून आणणार आहोत. अशा प्रकारच्या धमकीमुळे भारताच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रोपती मुमू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भारताचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी साहेब, ओम बिर्लाजी लोकसभा अध्यक्ष सांसद भवन नवी दिल्ली यांना माहितीसाठी निवेदन पाठविण्यात आल्याचे कळते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!