आमदार साहेब आमचे रस्ते कधी करता हो,,,, पवनसुत नगरातील नागरिकांची मागणी

मेहकर (उध्दव फंगाळ): मेहकर शहरात डोणगाव रोडवर नवीन वस्ती बनत आहे गेल्या कित्येक वर्षापासून या परिसरात सुशिक्षित वर्ग राहतात नगरपालिकेचा कर सुद्धा या परस्परांतील लोक भरतात वेळोवेळी लोकसभा, विधानसभा, नगरपालिका इत्यादी निवडणुकीत या भागातील मतदार वर्ग मतदान सुद्धा करतात मात्र नगरपालिकेकडून अथवा लोकप्रतिनिधी कडून या भागात कोणत्याही सुविधा असल्याचे दिसून येत नाही विशेष करून शिक्षक कॉलनी हा भाग भरपूर मोठा आहे या भागात वेगवेगळे नगर तयार झालेले आहे याचाच एक भाग म्हणून पवनसुत नगर सुद्धा आहे.

मात्र या पवनसुत नगरातील रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे दुचाकी व चार चाकी वाहन चालवताना या भागातील नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे वेळोवेळी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांच्याकडे रस्ते बनविण्यासाठी पवनसुत नगरातील नागरिकांनी मागणी सुद्धा केलेली आहे तर या भागातील रस्त्यासाठी कोट्यावधी रुपये मंजूर झाल्याचे सुद्धा सांगण्यात येत आहे काही दिवसापूर्वी या रस्त्याचे मोजमाप सुद्धा झाल्याचे समजते मात्र रस्त्याच्या कामाला अद्यापही सुरुवात झालेली नाही याउलट या भागातील काही नगरातील रस्ते सुद्धा तयार झाले आहेत.

ज्या भागात रस्त्याची अत्यंत गरज आहे त्या भागात अजूनही रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांना आपल्या दुचाकी व चारचाकी गाड्या दुसऱ्याच्या घरी किंवा रस्त्यावर ठेवाव्या लागतात चिखल तुडवत जावे लागते शाळेतील लहान लहान मुलांना सुद्धा कमालीचा त्रास होत आहे मात्र लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे केवळ निधी मंजूर झाला व मोजमाप झाले एवढ्या वरच हे काम थांबले आहे कामाला पुढे कुठे सुरुवात झाल्याचे दिसून येत नाही त्यामुळे या भागातील मतदार राजा मध्ये तीव्र स्वरूपाचा नाराजीचा सूर दिसून येत आहे.

कितीही वेळा मागणी करूनही रस्त्याला सुरुवातच होत नाही त्यामुळे नागरिकांनी सुद्धा आता मागणी करणे सोडून दिले आहे मात्र या भागातील लाखो रुपये कर नगरपालिका भरून घेत आहे तर मतदार वर्ग सुद्धा लोकसभा विधानसभा व नगरपालिका निवडणुकीत मतदान सुद्धा करतात एवढे करूनही साध्या मूलभूत सुविधा मिळत नाहीत त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत आहे त्यामुळे आमदार साहेब आमचे रस्ते कधी करता हो अशी आर्त हाक या परिसरातील नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!