शेवगाव – (पांडुरंग गोरे) अहमदनगरच्या काळ्या मातीतून तयार होणारा आगामी नवा मराठी चित्रपट दबंग गिरी एक बेधडक खाकी या चित्रपटातून एक सामाजिक संदेश देण्यात येणार आहे, या देशाच्या गद्दारा ना.. आता ठोकायची वेळ आली आहे, याची जिवंत उदाहरण या चित्रपटांमध्ये दाखवले आहे दबंगगिरी एक बेधडक खाकी या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण 10 फेब्रुवारी पासून बोधेगाव येथे चालू होणार आहे, या चित्रपटाचे निर्माते पांडुरंग गोरे, सतीश खांडविलकर व रविशा तेलधुणे सर यांनी या चित्रपटाची निर्मिती करणार आहे, या चित्रपटांमध्ये पोलीस भरतीची वेड लागलेल्या तरुणाची जिद्दीची गोष्ट व पोलिसांची महत्त्वकांक्षा व गुन्ह्याची उकल करताना पोलिसावरती येणारा दबाव..
एका डॅशिंगबाज पोलिसाची कथा या मराठी चित्रपटांमधून दाखवली आहे, त्याचबरोबर देशाला बरबाद करण्यासाठी आतंकवादी यांनी केलेला कट कसा उधळून लावला जातो या चित्रपटामध्ये दाखवली आहे, या देशाच्या गद्दारांना आता ठोकण्याची वेळ आली आहे…
या कॅच लाईन खाली या चित्रपटाची सुरुवात होत आहे, या मराठी चित्रपटांमधून मुख्य भूमिकेतून 18 कलावंत या चित्रपटांमधून दिसणार आहे तर या चित्रपटांमधून सहकलाकार यांची संख्या तीस ते पस्तीस होत असून 49 कलाकारा या चित्रपटातून पदार्पण करताना दिसणार आहेत या चित्रपटाचे दिग्दर्शन पांडुरंग गोरे यांनी केले आहे व येत्या नवीन वर्षापासून दबंग गिरी एक बेधडक खाकी हा मराठी चित्रपट झकास मनोरंजन चा मसाला असलेला चित्रपट सेट वरती जाणार आहे व 11 फेब्रुवारीपासून या चित्रपटाचे चित्रीकरण धुमधडाक्यात अहमदनगर जिल्ह्यात वेगवेगळ्या लोकेशनला ठिकाणी होणार आहे.
या चित्रपटाचे कास्टिंग दिग्दर्शक वंदना गव्हाणे, शिल्पा पवार यांची या चित्रपटांमध्ये भूमिका पाहण्यास मिळणार आहे व या चित्रपटांमधून कोण कोणते नवे कलाकार आपल्या भेटीस येत आहे याची उत्सुकता आता शिंगेला पोहोचली आहे, ग्रामीण भागातील नवोदित कलाकारांनी या चित्रपटासाठी संपर्क करावा असे आवाहन चित्रपटाचे दिग्दर्शक पांडुरंग गोरे (मो.9021553969) यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.