पैठण (हारूण शेख): पैठण तालुक्यातील व पैठण पोलीस ठाणे यांच्या अंतर्गत येणाऱ्या हद्दीतील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करावेत यासाठी निवेदन देण्यात आले. अवैध सट्टा, मटका, ऑनलाईन जुगार, पत्ते, देशी विदेशी दारू, ऑनलाईन जुगार, अवैध गुटखा विक्री रेती तस्करी, मुरूम तस्करी इतर अवैध धंदे बंद करण्यात यावे वरील प्रमाणे अवैध धंदे करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करावी तर नंबर प्लेट नसलेल्या वाहनां वर कडक कारवाई करावी. हायवा टिप्पर ट्रॅक्टर जनतेच्या जीवाशी खेळ खेळतात त्यांना कोणत्याही प्रकारचे भय वाटत नाही ते आपले वाहन भरधाव वेगाने चालवून समोरील व्यक्तिचा जीव धोक्यात आणतात.
शालेय विद्यार्थी व गावकरी यांना एका प्रकारे कमी पैशात जास्त पैसे कमविण्याचे आमिष दाखवून जुगार चालक गोरगरीब लोकांना फसवतात लालसेपोटी लोकांच्या संसाराचे वाटोळे होताना दिसत आहे. त्यामुळे कर्जबाजारी होऊन आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहत नाही व शालेय विद्यार्थी सुद्धा गुटखा पुडी, दारूचे व्यसन सह मटका ऑनलाईन जुगार यांच्या आहारी जात आहेत त्यामुळे त्यांचे भविष्य उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.
रेती, मुरूम तस्करी करणाऱ्या लोकांचे रेतीचे वाहन सुसाट वेगाने तसेच विना नंबर प्लेटचे असते रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्रास होत असून रेती तस्कर नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. यांना कोणीतेही भय राहिले नाही तसेच हे वाहन चालक एक्सीडेंट करून आपले वाहन पसार करताना दिसत आहे.
तसेच रेतीची चोरी मोठया प्रमाणात होत आहे. तसेच हे लोक कोणत्याही प्रकारच्या रॉयल्टी,पावत्या नसताना गावकऱ्यांना चढ्या भावाने रेती विक्री करताना दिसतात हे सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावे अशी मागणी छावा संघटनेचे प्रदेश सरचिटणीस अनिल राऊत यांनी निवेदनाद्वारे पोलीस उपअधीक्षक सुनील लांजेवार साहेब यांच्या केली आहे.
पोलीस प्रशासन व महसूल विभाग यांनी वरील अवैध धंदे करणाऱ्यांवर लोकांवर कारवाई करून अवैध धंदे बंद करावे नसता येत्या सात दिवसाच्या आत तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी मराठवाडा अध्यक्ष रामेश्वर बावणे, स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा जिल्हाध्यक्ष माऊली मुळे, सचिव भगवान सोरमारे, जिल्हाध्यक्ष विशाल काळे, कैलास गोर्डे आदी उपस्थित होते.