दारव्हा महसूल विभागाची धडक कारवाई | अवैध मुरूम वाहतूक करणाऱ्या सहा ट्रॅक्टरवर कारवाई

यवतमाळ/महागाव:- (सदानंद जाधव)

दारव्हा तालुक्यात अवैध मुरूम वाहतूक करणाऱ्यांच्या धुमाकूळ सुरू असून दिनांक 23 डिसेंबर रोजी अवैद्य मुरूम वाहतूक करणारे सहा ट्रॅक्टर जप्त करण्यात आले असून सदर सहा ट्रॅक्टर वाहतूक पोलिसांनी पकडले आहे. प्रशासनाच्या या कारवाईमुळे अवैध मुरूम व रेती उत्खनन करणाऱ्यांना चाप बसला आहे. तसेच दारव्हा परिसरात गेल्या काही दिवसापासून शासकीय जागेतून मुरुमाचे उत्खनन करून सर्रास अवैध वाहतूक सुरू आहे याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे मुरूम व रेती माफिया ची मजुरी वाढत आहे.

बोरी अरब परिसरातील दुधगाव येथील रेल्वे पुलाजवळ अवैद्य मुरमाची वाहतूक होत असल्याची विश्वसनीय माहितीच्या आधारे दारव्हा तहसीलदार विठ्ठल कुंबरे यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता अवैध्य मुरूम वाहतूक करणारे सहा ट्रॅक्टर आढळून आले असता ट्रॅक्टर चालकाकडून परवाना मागित असल्यास कुठलाही परवाना आढळून न आल्यामुळे सर्व ट्रॅक्टर वर महसूल विभागाकडून कार्यवाही करून सर्व ट्रॅक्टर पोलीस स्टेशन दारव्हा येथे जमा करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!