मेहकर( गजानन राऊत)
दैनिक विदर्भ सत्यजित हे वृत्तपत्र अतिशय कमी दिवसांमध्ये लोकांच्या विश्वासास पात्र ठरले आहे या वृत्तपत्रात शेतकरी हित, सामाजिक, साहित्य ,अध्यात्मिक अशा विविध बातम्या सडेतोड रोखठोक व सकारात्मक दृष्टिकोनातून सतत प्रकाशित होत आहेत दैनिक विदर्भ सत्यजित हे वृत्तपत्र ई पेपरच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे हे सर्व श्रेय दैनिक विदर्भ सत्यजितच्या प्रतिनिधींना जात आहे तसेच दैनिक साई संध्या सुद्धा ई पेपर च्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचला आहे.
दैनिक विदर्भ सत्यजित व साई संध्या या दोन वृत्तपत्राचे यशस्वीपणे वाटचाल सुरू असून सर्व जाती धर्माच्या बातम्या या वृत्तपत्रात प्रकाशित होत आहेत त्यामुळे जालना तालुक्यातील भोकरदन येथे 24 डिसेंबर रोजी धनगर समाजाचे नेते दीपक भाऊ बोराडे यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमात दैनिक विदर्भ सत्यजित मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच धनगर समाजाच्या हितासाठी व धनगर समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या काही दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यात युवा नेतृत्व उदयास येत आहे यशवंत सेनेचे बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख आंदोलन सम्राट गजानन बोरकर यांनी धनगर हितासाठी अनेक आंदोलना केली आहेत त्यांचे आंदोलनाची दखल घेऊन यावेळी आंदोलन सम्राट गजानन बोरकर यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला यावेळी यशवंत सेनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष धनंजय रोंदळे तसेच धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते मुरलीधर लांभाडे, नव्हाळे सर उपस्थित होते