मेहकर (उध्दव फंगाळ)
सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि क्रिडा जागृती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चौथ्या महाराष्ट्र राज्य रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा बारामती येथे 23 व 24 डिसेंबर रोजी संपन्न झाल्या. या स्पर्धेत शिवाली प्रमोद जाधव, मेहकर जि. बुलढाणा हिने युथ ग्लर्स (14 वर्षांखालील मुलींच्या) टाईम ट्रायल या प्रकारात संपूर्ण महाराष्ट्रातून चौथा क्रमांक मिळविला.
या कामगिरीच्या जोरावर विजयापूर (कर्नाटक) येथे 9 ते 13 जानेवारी 2024 दरम्यान होणाऱ्या 28 व्या राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात तीची निवड झाली आहे. सायकलिंग सारखा क्रिडाप्रकार जिथे पुणे, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्राचे वर्चस्व आणि सर्व सोईसुविधा उपलब्ध आहेत तिथे विदर्भातील मेहकर सारख्या तालुक्यातून राष्ट्रीय पातळीवर पोहचल्यामुळे शिवालीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. तिच्या यशाचे श्रेय ती तिचे पालक आणि कोच यांना तसेच अथक परिश्रमांना देते.